Agriculture news in Marathi No need for 72 hours: Commissioner | Agrowon

७२ तासांची सक्ती नको ः आयुक्त

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार दिला आहे. तसेच नुकसानीची सूचना (इंटिमेशन) देण्यासाठी शेतकऱ्यांना ७२ तासांची सक्ती करता येणार नाही, अशी ठाम भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. 

पुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार दिला आहे. तसेच नुकसानीची सूचना (इंटिमेशन) देण्यासाठी शेतकऱ्यांना ७२ तासांची सक्ती करता येणार नाही, अशी ठाम भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. 

पीकविमा योजनेत विमा कंपन्यांकडून सुरू असलेल्या सावळ्यागोंधळाबाबत  ‘अॅग्रोवन’मधून प्रसिद्ध झालेल्या राज्यस्तरीय स्थितीची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली. नुकसानीची माहिती वेळेत न मिळाल्याचे कारण सांगून बोळवण केली जात असल्याचे चित्र राज्यभर तयार झालेले आहे. आयुक्तांनी या समस्येवर तोडगा काढला आहे.

काढणीपश्‍चात नुकसान किंवा स्थानिक आपत्ती अंतर्गत पिकाचे नुकसान झाल्यास वीमा कंपनीला कळविण्याची जबाबदारी शेतकऱ्याची असते. त्यासाठी यापूर्वी अवघे ४८ तास देण्यात आले होते. या तासात कळविले नाही तर कंपन्यांकडून भरपाई दिली जात नव्हती. मात्र राज्याच्या अनेक भागात नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सरकारी यंत्रणेला देखील एकमेकांशी संपर्क साधण्यात अपयश येते. तेथे, दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकरी वर्गाला ४८ तासांचा कालावधी अपुराच ठरत होता. त्यामुळे ही सुविधा ७२ तासांची करण्यात आली होती. मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान मांडले आहे. त्यामुळे ७२ तासांची सवलतदेखील अपूर्ण पडते आहे. 

आयुक्त धीरज कुमार यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले, की राज्याच्या काही भागांत सतत पाऊस, खंडित वीजपुरवठा अशा समस्या उद्‌भवल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे भ्रमाणध्वनी चालू करण्यात अडचणी येत आहेत. तसेच इंटरनेट संपर्कातही अडथळे येत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत शेतकरी आपल्या पीक नुकसानीची सूचना कोणत्याही कृषी कार्यालयात देऊ शकतात. ती ग्राह्य धरली जाईल. तसेच विमा कंपन्यांनादेखील ७२ तासाच्या अटीचा आग्रह धरता येणार नाही.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता कृषी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व स्वतः सूचना (इंटिमेशन) संकलित कराव्यात, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. “सर्व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सूचना गोळा करून त्या विमा कंपनीला तातडीने सुपूर्द कराव्यात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून शेतकऱ्यांच्या सूचना संकलित केल्या जात आहे की नाही, याविषयी खात्री करावी,” असे आयुक्तांनी सूचित केले आहे. 

आयुक्तांनी बुधवारी (ता. २८) विमा कंपन्यांची तातडीची बैठकदेखील बोलावली. शासनाच्या नियमानुसार जिल्हास्तरीय कार्यालये व मनुष्यबळाची व्यवस्था केली की नाही तसेच शेतकऱ्यांकडून आलेल्या सूचना आणि त्याप्रमाणे होणारी पाहणी होते आहे की नाही, याचा आढावा आयुक्तांनी घेतला. “कार्यालय नसल्याबद्दल एका विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. इतर कंपन्यांनी यातून धडा घेतला नाही तर अशीच कारवाई पुन्हा करावी लागेल”, असा इशाराही आयुक्तांनी दिला.


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...