जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
श्री विठ्ठल दर्शनासाठी आता ऑनलाइन पासची गरज नाही; ओळखपत्र चालणार
पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग न करताही आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र दाखवून भाविकांना मुखदर्शन मिळणार
सोलापूर : पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग न करताही आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र दाखवून भाविकांना मुखदर्शन मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची नुकतीच बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना औसेकर यांनी ही माहिती दिली. विठ्ठल दर्शनासाठी सोयी-सुविधा आणि उपाय यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. औसेकर महाराज म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भाविकांसाठी ऑनलाइन बुकिंग मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे. १२ जानेवारीपासून आठ हजार भाविक याचा लाभ घेऊ शकतील. यापूर्वी ४ हजार ८०० भाविकांना रोज दर्शनाचे पास मिळत होते. यात आता वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, २० जानेवारीपासून जे भाविक ऑनलाइन बुकिंग न करता दर्शनाला येतील त्यांनाही ओळखपत्र (आधार कार्ड व अन्य) पाहून कोरोनाविषयक आरोग्य नियमांचे पालन करून श्रींचे मुखदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विना बुकिंग ओळखपत्र दाखवून दर्शनासाठी कासार घाट येथून सोडले जाणार आहे. दहा वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील वृद्ध, तसेच गर्भवती महिला व आजारी व्यक्ती यांना प्रवेशबंदी आहे.
या बैठकीसाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी सुरेश कदम, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नगराध्यक्ष साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
- 1 of 653
- ››