भुईमुगाला झाली नाही शेंगधारणा; शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी

उमरखेड तालुक्‍यातील दराटी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची लागवड केली. परंतू, त्याला शेंगाच लागल्या नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यासंदर्भात चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी उमरखेड तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
भुईमुगाला झाली नाही शेंगधारणा; शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी
भुईमुगाला झाली नाही शेंगधारणा; शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी

यवतमाळ : उमरखेड तालुक्‍यातील दराटी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची लागवड केली. परंतू, त्याला शेंगाच लागल्या नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यासंदर्भात चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी उमरखेड तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  दराटी येथील जवळपास वीस शेतकऱ्यांनी फुलसावंगी येथील एका एजन्सीच्या माध्यमातून एका खासगी कंपनीचे बियाणे खरेदी केले. बियाणे उगवले, त्याची वाढही झाली परंतू त्याला शेंगधारणाच झाली नाही. सदर बियाणे कृषी केंद्रचालकाने चांगले बियाणे आहे, म्हूणन दिले. परंतू या बियाण्याला शेंगाच लागल्या नाही. अशा प्रकारे कृषी केंद्रचालकाने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात करून आर्थिक नुकसान केले. म्हणून याप्रकरणी चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.  गावातील काही शेतकऱ्यांनी दुसऱ्या कंपनीचे बियाणे लावले. त्या वाणाला शेंगा लागल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. परंतू अहवालात लॉट नंबर चुकीचा टाकण्यात आला. बॅगवरच्या बॅचवर वेगळाच लॉट नंबर नमूद आहे. १०० टक्‍के नुकसान झाले असताना ७० टक्‍केच दाखविण्यात आले आहे. वास्तविकतः या कंपनीचा कोठेही मोठा प्लॅंट नाही. नांदेड येथील एका घरातूनच बियाण्यासंदर्भातील प्रक्रियेचे कामकाज केले जाते. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गोरखधंदा सुरू असल्याचेही निवेदनात नमूद आहे.  कृषी केंद्र करा सील  भविष्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता कृषी विभागाने संबंधित कृषी सेवा केंद्र सील करावे. त्याकरिता कायद्यातील पूरक तरतुदींचा आधार घ्यावा, असे निर्देश आमदार नामदेव ससाणे यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com