मंत्रिपदावरून कोणीही नाराज नाही ः शरद पवार

No one is offended by the cabinet: Sharad Pawar
No one is offended by the cabinet: Sharad Pawar

नगर ः महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रिपदावरून नाराज नाही. उलट मी अनेकांना गृहखाते हवे का? अशी विचारणा केली. परंतु कोणीच तयारी दर्शवली नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री. पवार गुरुवारी (ता. २) नगरमध्ये आले होते, त्या वेळी त्यांंनी पत्रकारांशी संवाद साधला. 

श्री. पवार म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये खातेवाटपाचा दबाव कोणावरही नाही. खातेवाटपाचा निर्णय जाहीर होण्यास विलंब झालेला नाही. पूर्वी एक पक्ष असतानाही दोन दिवस मंत्र्यांना जबाबदारी देताना लागत होते. आता तर तीन पक्ष एकत्र आहेत. सर्वांनी एकत्र बसून खातेवाटपाचा निर्णय आठ दिवसांपूर्वी झालेला आहे. आज किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री खातेवाटपाचा निर्णय जाहीर करतील. पवार म्हणाले की, नवीन पिढी मंत्रिमंडळात आणण्याचा प्रयत्न केलेला असून नगर जिल्ह्यातही नवीन पिढी पुढे आणली आहे. 

या नवीन पिढीला कामही खूप देणार आहे. राज्यमंत्र्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे प्रत्येक राज्यमंत्र्याला पाच ते सहा खाती सांभाळावी लागणार आहेत. नगरला मंत्रिपद देताना उत्तर व दक्षिण असे केलेले नाही. नगर जिल्ह्याचा विचार मी वेगळ्या पद्धतीने केला. प्रत्येक तालुक्‍यात मंत्रिपद कोणा कोणाला दिले, याचा विचार केला. हा विचार करत असताना मला राहुरी मोकळी दिसली. त्यामुळे राहुरीला मंत्रिपद दिलेले आहे.

‘महाआघाडीचे अनेक राज्यांतून स्वागत’ शरद पवार म्हणाले, ‘‘राज्यात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे इतर अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणा झाली आहे. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे.’’

राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाराज नाही. सगळ्यांना माहिती आहे की तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्‍नच येत नाही. राष्ट्रवादीतील मी प्रत्येकाला गृह खाते घ्या म्हणून विचारले. परंतु, प्रत्येकजण दुसरे मागत होता. आमच्याकडे नको म्हणणारे खूप आहेत. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com