आई अन्‌ झाडापेक्षा जगात कुणी निःस्वार्थी नाही : सयाजी शिंदे

आई अन्‌ झाडापेक्षा जगात कुणी निःस्वार्थी नाही : सयाजी शिंदे
आई अन्‌ झाडापेक्षा जगात कुणी निःस्वार्थी नाही : सयाजी शिंदे

नाशिक : झाड मुलासारखं जपावं, त्याच संगोपन करावं, मुलं जशीजशी वाढतात, त्या प्रत्येक टप्प्यावर आपण लक्ष ठेवून काळजी घेतो. त्याचप्रमाणे सर्वांनी याच उद्देशाने पर्यावरण समृद्ध करण्यासाठी पुढे यावं, झाडं लावावीत व ती जगवावीत. आपली मुलं आपल्याला ज्या पटीने मदत करणार नाहीत, त्याच्या दस पटीने लावलेली झाडं मदत करतील, त्यामुळे आई अन् झाडं यापेक्षा जगात कुणीही निःस्वार्थी नाही, असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. आपलं पर्यावरण संस्था व नाशिक वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक वनराई वचनपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. 

नाशिक शहराच्या उत्तरेला वनराई या प्रकल्पामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी आपलं पर्यावरण संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. यात अनेक नागरिक व तरुणांचा सक्रिय सहभाग आहे. याच उद्देशाने 'चला लाडक्या रोपट्याचा तिसरा वाढदिवस साजरा करूया, नाशिक वनराई समृद्ध करूया' हे ब्रीद घेऊन नाशिक वनराईचा वचनपूर्ती सोहळा संपन्न झाला. 

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील पर्यावरणप्रेमी मंडळी एकत्र येऊन शहरातील म्हसरूळ येथील वनडेपोच्या जागेत त्यांनी लावलेल्या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी येथे आपण लावलेल्या झाडाच्या सभोवताली आळ्यात सजावट करण्यासाठी फुलांच्या पाकळ्या टाकून झाडाला सजविले. या वर्षी लावलेल्या झाडांचा हा तिसरा वाढदिवस होता. 

या प्रसंगी जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, कृषिभूषण शिवराम घोडके, सह्याद्री फार्म्सचे चेअरमन विलास शिंदे, मुख्य वनसंरक्षक शेळके, उपवनसंरक्षक फुले, आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड, मनपा सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक रुची कुंभरकर, मनपा उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com