agriculture news in Marathi, no one will do politics on water, Maharashtra | Agrowon

पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः मुख्यमंत्री फडणवीस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य लोकांना पाण्‍यासाठी एकत्र आणून पाणी चळवळ उभारण्‍याचे काम पाणी फाउंडेशनने केले. यापुढेही हे काम चालू ठेवण्यासाठी `जिथे पाणी, तिथे सर्व पक्ष एकत्रित येतील. यात कोणतेही पक्षीय राजकारण करणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.  

पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य लोकांना पाण्‍यासाठी एकत्र आणून पाणी चळवळ उभारण्‍याचे काम पाणी फाउंडेशनने केले. यापुढेही हे काम चालू ठेवण्यासाठी `जिथे पाणी, तिथे सर्व पक्ष एकत्रित येतील. यात कोणतेही पक्षीय राजकारण करणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.  

पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘वॉटर कप २०१८’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण रविवारी (ता. १२) पार पडला. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता आमीर खान, किरण राव, पोपटराव पवार आणि पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले, की ज्या गतीने पाणी फाउंडेशनचे काम होत आहे, त्यातून नक्कीच राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल. या चळवळीला बळ देण्‍यासाठी वॉटर कप स्‍पर्धेतील विजेत्‍या गावांना शासनाच्‍या वतीने प्रोत्‍साहनपर अनुक्रमे पंचवीस लाख, पंधरा लाख आणि दहा लाखांचे बक्षीस देण्यात येईल. 
अजित पवार म्हणाले, की पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे भूजलपातळी खोल जात आहे. पाणीपातळी वाढविण्यासाठी श्रमदान, लोकवर्गणी आणि लोकसहभाग यांना महत्त्व द्यावे लागणार आहे. काहीजण बोलघेवडे असतात. फक्त बोलून सभा गाजवतात आणि निघून जातात. त्यांना काही काम करायचे नसते.

अभिनेता आमीर खान म्हणाले, की तीन वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनचा जन्म झाला, तोच मुळी राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी. या स्वप्नपूर्तीच्या प्रवासातील प्रत्येक क्षण आयुष्यभर माझ्यासोबत राहील. मी या प्रवासाला नव्हे तर हा प्रवास मला पूर्ण करत आहे. ‘‘इतकी वर्षे सिंचनाचा पैसा गेला कुठे? पाणी फाउंडेशनच्या कामासाठी शासकीय अधिकारी मदत करतात. तर शासनाच्या काम का करत नाही,’’ असे प्रश्न राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केले. ‘‘पाणी फाउंडेशनच्या कामासाठी आम्ही सर्व पाठिंबा देत आहोत,’’ अशी ग्वाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जलसंपा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल मुख्यमंंत्र्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सत्‍यजित भटकळ यांनी केले. तर जितेंद्र जोशी, स्‍पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

पाणी फाउंडेशनचे राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार पुढीलप्रमाणे  
 प्रथम क्रमांक 

टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा (७५ लाख व सन्‍माचिन्‍ह )
 द्वितीय क्रमांक - विभागून 
१) भांडवली, ता. माण, जि. सातारा  , 
२) सिंदखेडा ता. मोताळा, जि. बुलडाणा (प्रत्‍येकी २५ लाख रुपये व मानचिन्‍ह)
 तृतीय क्रमांक - विभागून 
१) आनंदवाडी, ता. आष्‍टी, जि. बीड, 
२) उमठा, ता. नरखेड, जि. नागपूर.  
(प्रत्‍येक २० लाख व मानचिन्‍ह)


इतर अॅग्रो विशेष
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...