रेशन दुकानात ३१ मार्चपर्यंत ई-पॉस मशिन न वापरण्याची परवानगी

पुणे ः सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशन दुकानातून शिधा वस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांना ‘कोरोना’चा संसर्ग होऊ, नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोमेट्रिक पडताळणी न करता लाभार्थ्यांना दुकानदारांनी धान्य देण्याची परवानगी दिली आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती आॅल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर्स फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.
No permission to use e-pos machine at ration shop till March 31

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येईल, तसेच रास्त भाव दुकानांवर गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता टोकन घेऊन लाभार्थ्यांनी नियोजित वेळी दुकानावर येण्याची खबरदारी घ्यावी. तसेच, धान्य घेण्यास आलेले लाभार्थी योग्य अंतर ठेवून रांगेत उभे राहतील, याचीही दक्षता रास्त भाव दुकानदारांनी घ्यावी.

कल्याणकारी संस्थांची संख्या असल्याने या संस्थांना गोदामातून देण्यात येणारे धान्य वितरित करताना संबंधितांनी साबणाने, सॅनिटायझरने हात स्वच्छ करून ई-पॉस उपकरणे हाताळण्याची काळजी घ्यावी. तसेच लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना धान्यांचा अपहार, अनियमितता होणार नाही, याची दक्षता रास्त भाव दुकानदारांनी घ्यावी.

संघटनेच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला होता. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ई-पॉस मशिनचा वापर काही दिवसांकरिता स्थगित करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत या विभागाने त्यांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. - विजय गुप्ता, खजिनदार, आॅल महाराष्ट्र फेअरप्राइज शॉपकिपर्स फेडरेशन  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com