agriculture news in Marathi no possibility of rate of soybean down Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही 

अनिल जाधव
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या पामतेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. 

पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या पामतेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. झाला तरी तो कमी काळासाठी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता टप्प्याटप्प्याने विकावे. तसेच आंतरराष्ट्रीय मूलभूत घटकांचा विचार करता सोयाबीन भाव खाणार आहे, अशी माहिती शेतमाल बाजार विश्‍लेषक, सोयाबीन प्रक्रियादार आणि व्यापारी सूत्रांनी दिली. 

देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे दर सप्टेंबर महिन्यापासून वाढत होते. बहुतेक तेलाचे दर हे लिटरमागे १५ ते ३० रुपयांनी वाढले होते. त्यातच खरिपात तेलबिया उत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यावर आणखी दबाव निर्माण झाला. त्यामुळे केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क कपात करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त पसरले होते. त्यानुसार सरकारने गुरुवारी कच्च्या पामतेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात करून ३७.५ वरून २७.५ टक्के केले आहे. त्याचा परिणाम पामतेलाच्या दरावर झाला असून दरात लिटरमागे ५ रुपयांपर्यंत घट झाली आहे. 

मध्य प्रदेशातील सोयाबीन व्यापारी राघव झावर म्हणाले, की केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मध्य प्रदेशातील सोयाबीन बाजारावर कुठलाही परिणाम झाला नाही. दर आजही तेजीतच आहेत. 

कच्च्या पामतेल आयात कपातीचा मात्र सोयाबीन बाजारावर परिणाम झाला नाही. काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर १०० ते २०० रुपयांनी कमी झाले होते. त्यातही आता हळूहळू सुधारणा होत असून सध्या बाजारात प्लांट गुणवत्तेच्या सोयाबीनचे दर ४१०० ते ४३०० रुपयांदरम्यान आहेत. तर बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनचे दर ४४५० ते ४५५० रुपयांपर्यंत आहेत. 

टप्प्याटप्प्याने विक्री फायदेशीर 
शेतमाल बाजारात मूलभूत घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे दरात बऱ्याचदा चढउतार होत असतात. असे सोयाबीनमध्ये मागील काही दिवासांमध्ये झाले. दर कमी झाल्यानंतर परत सुधारत आहेत. त्यातच सरकारच्या या निर्णयासंदर्भात अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु सोयाबीनला बाजार मजबूत असून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता एकाचवेळी संपूर्ण माल विकण्याऐवजी टप्‍प्याटप्प्याने बाजारात आणावा, असे आवाहन बाजार विश्‍लेषकांनी केले आहे. 

प्रतिक्रिया
देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर पामतेलाचा वापर करणाऱ्या गरीब आणि मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बाजारात पामतेल ४ ते ५ रुपये स्वस्त झाले आहेत तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेल एक ते सव्वा रुपये स्वस्त झाले. तेलाचे दर जास्त कमी झाले तर सरकार पुन्हा आयात शुल्क वाढीचा निर्णय घेऊन शकते. 
- डॉ. बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर असोसिएशन 

सध्या पामतेलाचे दर ३० रुपयांनी तुटले आहेत, आणखी २० रुपये दर कमी होतील. त्यापेक्षा अधिक दर कमी होणार नाहीत. सोयाबीनचे दरही गेल्या काही दिवसांत तुटून ४३०० रुपयांवर आले आहेत. त्यात डिसेंबरमध्ये आणखी घट होणार नाही. 
- दिनेश सोमाणी, शेतमाल बाजार विश्‍लेषक 

खूप मेहनतीने खाद्यतेल आयात शुल्क वाढविले होते. तेलबिया पिकांचे दर नुकतेच वाढत होते. त्यामुळे शेतकरीही तेलबिया पेरणी वाढवत होते. मात्र मध्येच काय माशी शिंकली काय माहीत. पण मी कालच केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. यासंबंधी लवकरच पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. 
- पाशा पटेल, माजी अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग 

कच्च्या पामतेल आयात कपातीचा कोणताही परिणाम सोयाबीनवर होणार नाही. सरकारने उद्या रिफाइंड पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या आयात शुल्कातही कपात केली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील घटकांमुळे सोयाबीन दरात फारसा फरक पडणार नाही. 
- प्रमोद बंसल, सोयाबीन व्यापारी, मध्य प्रदेश 

सरकारच्या निर्णयाचा कोणताही परिणाम सोयाबीन दरावर होणार नाही. सध्या बाजारात ४२०० ते ४३०० रुपये दराने प्लांट गुणवत्तेचे तर बियाणे गुणवत्तेचे सोयाबीन ४५०० रुपयाने विकत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कारणांमुळे दरातील ही तेजी कायम राहील. 
- आनंद चरखा, संचालक, बालाजी कृषी बाजार, वाशीम 


इतर अॅग्रो विशेष
थंडी कायम राहण्याची शक्यता पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...