पावसाची आज उघडीप राहणार; थंडी परतणार

राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहे. यातच उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणार असल्याने राज्यात गारठा परतण्याची शक्यता आहे.
पावसाची आज उघडीप राहणार; थंडी परतणार
पावसाची आज उघडीप राहणार; थंडी परतणार

पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहे. यातच उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणार असल्याने राज्यात गारठा परतण्याची शक्यता आहे. आज (ता.८) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर जिल्ह्यांसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, अलिबाग येथे प्रत्येकी ३० मिलिमीटर, तर चिपळूण, लांजा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पावसाळी वातावरणामुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली असली, तरी किमान तापमान कमी होऊ लागले आहे. रविवारी (ता. ७) गोंदिया आणि नागपूर येथे नीचांकी १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे उच्चांकी कमाल ३४.६ अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३१.७ (२०.६), जळगाव ३२.७ (१६.५), कोल्हापूर ३२.२ (२१.५), महाबळेश्‍वर २४.३ (१६.४), मालेगाव ३१.४ (१९), नाशिक २९.५ (२०.४), सांगली ३२.४ (२२), सातारा ३०.६ (२०.९), सोलापूर ३४.६ (१८.६), सांताक्रूझ ३३.९(२५), डहाणू ३२ (२५), रत्नागिरी ३४.४ (२२.१), औरंगाबाद ३०.५ (१७), नांदेड ३२.४ (१८.२), परभणी ३१.९ (१७.५), अकोला ३२.८ (१८.९), अमरावती ३१.६ (१६.२), ब्रह्मपुरी ३२.९ (१६.२), बुलडाणा ३१ (१६.५), चंद्रपूर ३२.६ (१६.४), गडचिरोली ३३.६(१७), गोंदिया ३१.२ (१५.५), नागपूर ३१.४ (१५.५), वर्धा ३१ (१६.८), वाशीम ३२ (२०), यवतमाळ ३०.५ (१६.५). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com