बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची नोंदणी होईना

बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची नोंदणी होईना
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची नोंदणी होईना

बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत सातबारावर अपडेटेड पेरा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे हमीदराने शेतीमाल विकण्याऐवजी बाजारात सुरू असलेल्या दराने शेतीमालाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याशिवाय उत्पादनातील घटही हमीदराने खरेदीला प्रतिसाद न मिळण्याचे कारण ठरत असल्याची स्थिती आहे.

बीड जिल्ह्यात यंदा हो नाही म्हणत नाफेडकडून मार्केटिंग फेडरेशनने प्रस्तावित केलेल्या नऊ खरेदी केंद्राच्या प्रस्तावापैकी आठ केंद्रांना मंजुरी दिली. यामध्ये माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, आष्टी, गेवराई, बीड, शिरूर या केंद्रांना मंजुरी दिली गेली. हंगाम उशिरा त्यात केंद्रही उशिराच मंजूर झाली. परंतु या केंद्रावरून खरेदीसाठीची नोंदणी करण्यासाठी उडीद, मुगासाठी १५ ऑक्‍टोबर, तर सोयाबीनसाठी ३१ ऑक्‍टोबरची मुदत दिली गेली.   पाटोदा येथील प्रस्तावित केंद्रला मंजुरी मिळाली नव्हती. या मुदतीत जिल्ह्यातील आठ मंजूर केंद्रापैकी केवळ अंबाजोगाई व बीड केंद्रावरच प्रत्येकी एका शेतकऱ्यांने नोंदणी केली. याशिवाय जिल्ह्यातील जवळपास दहा शेतकरी उत्पादक कंपन्या महाएफपीसीतर्फे हमीदराने खरेदीसाठी पुढे आल्या आहेत. या कंपन्यांकडे जवळपास हजार शेतकऱ्यांनी हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.  

शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी का होत नाही, याविषयीच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी यंदाचा अद्ययावत खरीप पीकपेरा नोंदीचा सातबारा न मिळणे ही त्यामागील सर्वांत मोठी अडचण असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय यंदा पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी उशिरा झाली. त्यामुळे काढणी उशिरा सुरू झाली. पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादनातही घट आली. सोबतच हमीदराने खरेदीसाठी माल नेला, तर त्याचे पैसे वेळेत मिळतील, की नाही या शंकने शेतकऱ्यांचा नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com