Agriculture news in marathi, No registration of guarantee purchase of agricultural goods in Beed district | Page 2 ||| Agrowon

बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची नोंदणी होईना
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत सातबारावर अपडेटेड पेरा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे हमीदराने शेतीमाल विकण्याऐवजी बाजारात सुरू असलेल्या दराने शेतीमालाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याशिवाय उत्पादनातील घटही हमीदराने खरेदीला प्रतिसाद न मिळण्याचे कारण ठरत असल्याची स्थिती आहे.

बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत सातबारावर अपडेटेड पेरा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे हमीदराने शेतीमाल विकण्याऐवजी बाजारात सुरू असलेल्या दराने शेतीमालाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याशिवाय उत्पादनातील घटही हमीदराने खरेदीला प्रतिसाद न मिळण्याचे कारण ठरत असल्याची स्थिती आहे.

बीड जिल्ह्यात यंदा हो नाही म्हणत नाफेडकडून मार्केटिंग फेडरेशनने प्रस्तावित केलेल्या नऊ खरेदी केंद्राच्या प्रस्तावापैकी आठ केंद्रांना मंजुरी दिली. यामध्ये माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, आष्टी, गेवराई, बीड, शिरूर या केंद्रांना मंजुरी दिली गेली. हंगाम उशिरा त्यात केंद्रही उशिराच मंजूर झाली. परंतु या केंद्रावरून खरेदीसाठीची नोंदणी करण्यासाठी उडीद, मुगासाठी १५ ऑक्‍टोबर, तर सोयाबीनसाठी ३१ ऑक्‍टोबरची मुदत दिली गेली.  
पाटोदा येथील प्रस्तावित केंद्रला मंजुरी मिळाली नव्हती. या मुदतीत जिल्ह्यातील आठ मंजूर केंद्रापैकी केवळ अंबाजोगाई व बीड केंद्रावरच प्रत्येकी एका शेतकऱ्यांने नोंदणी केली. याशिवाय जिल्ह्यातील जवळपास दहा शेतकरी उत्पादक कंपन्या महाएफपीसीतर्फे हमीदराने खरेदीसाठी पुढे आल्या आहेत. या कंपन्यांकडे जवळपास हजार शेतकऱ्यांनी हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.  

शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी का होत नाही, याविषयीच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी यंदाचा अद्ययावत खरीप पीकपेरा नोंदीचा सातबारा न मिळणे ही त्यामागील सर्वांत मोठी अडचण असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय यंदा पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी उशिरा झाली. त्यामुळे काढणी उशिरा सुरू झाली. पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादनातही घट आली. सोबतच हमीदराने खरेदीसाठी माल नेला, तर त्याचे पैसे वेळेत मिळतील, की नाही या शंकने शेतकऱ्यांचा नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...