Agriculture news in Marathi, No sir just visit, please help | Agrowon

साहेब आता नुसता दौरा नको, मदत द्या

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

नाशिक : ‘‘अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने साहेब आमचे अतोनात नुकसान झाले. सगळा खर्च वाया गेला. आता महिना उलटला तरीदेखील मदत मिळालेली नाही. रब्बी हंगाम तोंडावर असताना आम्ही करायचं काय अन् जगायचं कसं? असा प्रश्न उपस्थित करीत साहेब, केंद्रीय पथकाचा नुसता दौरा नको तर मदत द्या’’ अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नाशिक : ‘‘अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने साहेब आमचे अतोनात नुकसान झाले. सगळा खर्च वाया गेला. आता महिना उलटला तरीदेखील मदत मिळालेली नाही. रब्बी हंगाम तोंडावर असताना आम्ही करायचं काय अन् जगायचं कसं? असा प्रश्न उपस्थित करीत साहेब, केंद्रीय पथकाचा नुसता दौरा नको तर मदत द्या’’ अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी (ता. २२) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. केंद्रीय वित्त मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ, शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठक घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष पीक पाहणी केली. विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदीसह कृषी विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

नुकसानीच्या पाहणीची सुरुवात निफाड तालुक्‍यातील पाचोरे वणी येथून झाली. येथील बाळू वाटपाडे यांच्या मका पिकाची पाहणी, भास्कर वाटपाडे यांचे सोयाबीन पिकाची तर बाजीराव गंगाधर यांच्या द्राक्षाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्याशी चर्चा केली. त्यानंतर दुसरी पाहणी खडक मालेगांव येथील ज्ञानेश्वर शिंदे यांचे मिरची व द्राक्षे, रंगनाथ शिंदे यांच्या सोयाबीन व मका रंगनाथ पोपट शिंदे यांच्या ज्वारी व बाजरी पिकांची पाहणी केली. दहेगांव येथील अण्णा कनोर व धर्मा कनोर यांच्या कांदा पिकाची, तर चांदवड तालुक्यातील निमोण गावातील मनोज ललवाणी व पंढरीनाथ देवरे यांच्या कांदा पिकाची तर शंकर गांगुर्डे यांच्या द्राक्ष बागांची पाहणी करून पंचनाम्याची तपासणी केली. 

मालेगांव तालुक्‍यातील चौंडी येथील अशोक सरोदे यांचे भुईमूग, लक्ष्मण सरोदे यांच्या कांदा व डाळिंब पिकाची पाहणी तर वऱ्हाणे गावातील रमेश पवार यांचे कांदा पिकाची तर भाऊसाहेब अहिरे यांच्या मका पिकाची पाहणी केली. मात्र हे पथक नुकसान झाल्यानंतर एक महिन्यानंतर आल्याने शेतकऱ्यांनी त्यांनी जाब विचारला. 
 


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...