पुणे विभागात रब्बीचे चार लाख हेक्टर क्षेत्र नापेर

बदलते हवामान यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुणे विभागात अजूनही ३ लाख ९४ हजार १८२ हेक्टर म्हणजेच २६ टक्के क्षेत्र नापेर राहिले असल्याचे चित्र आहे.
no sowing rabi area of ​​four lakh hectares in Pune division
no sowing rabi area of ​​four lakh hectares in Pune division

पुणे ः सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उशिराने पेरणीला सुरुवात झाली. त्यातच बदलते हवामान यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुणे विभागात अजूनही ३ लाख ९४ हजार १८२ हेक्टर म्हणजेच २६ टक्के क्षेत्र नापेर राहिले असल्याचे चित्र आहे.  

चालू वर्षी पुणे विभागात चांगला पाऊस झाला होता. यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज होता. त्यानुसार कृषी विभागानेही नियोजन केले होते. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये चांगलाच पाऊस झाला. यामुळे पेरणीसाठी पुरेसा वाफसा न झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळले आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पोषक हवामान नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पेरणीऐवजी कांदा लागवडीकडे वळवला. त्यामुळे रब्बी हंगामात कांद्याच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.

विभागात रब्बीचे सरासरी १४ लाख ४९ हजार ७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १० लाख ४६ हजार ८२४ हेक्टर म्हणजेच ७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारी पिके कणसाच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी चिकटा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यावर कृषी विभागाने शेतीशाळेचे नियोजन करून उपाययोजना सुचविण्यात येत आहेत. गहू पिकास पोषक वातावरण असले पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com