पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही ः मलिक

परभणी ः ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कुटुंबांना नळजोडण्याव्दारे पिण्यासाठी शुध्द पाणी देण्यात येत आहे. नळपाणीपुरवठा योजनेपासून एकही गाव वंचित राहणार नाही,’’ अशी ग्वाही पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
No village from water supply Will not be deprived: Malik
No village from water supply Will not be deprived: Malik

परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कुटुंबांना नळजोडण्याव्दारे पिण्यासाठी शुध्द पाणी देण्यात येत आहे. नळपाणीपुरवठा योजनेपासून एकही गाव वंचित राहणार नाही,’’ अशी ग्वाही पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

जल जीवन मिशन प्रस्तावित आराखडा बैठकीत रविवारी (ता.२४) ते बोलत होते. आमदार बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.

मलिक म्हणाले, ‘‘प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी किमान ५५ लिटर पाणी हे मिळाले पाहिजे. पाण्याचा काटेकोर वापर व्हावा. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ही पाणीपुरवठा योजना आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नळांना तोट्या लावाव्यात.’’

मुगळीकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये ६८ हजार ६०४ नळजोड देण्याचे उद्दिष्ट आहे. आजवर ७२ हजार ३९ नळजोडण्याची नोंद संकेतस्थळावर झाली आहे. उद्दिष्टाच्या १०५.०१ टक्के काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन अंतर्गत ३५ योजना मंजूर व प्रगतिपथावर आहेत. १८ योजनांव्दारे गावास पाणी पुरवठा करण्यात आला आहे.’’ 

‘‘जिल्ह्याचा २०२०-२१ साठीचा कृती आराखडा तयार आहे. त्यात अ- वर्गवारी ५५ लिटर दरडोई प्रमाणे पाणी उपलब्ध होणारी २०५ गावे , ४०  ते ५५ लिटर दरडोईची ३१३ गावे आहेत. ब - वर्गवारीत ४० लिटर पेक्षा कमी दरडोईची १४० गावे आहेत. अ- वर्गवारीतील ५१८ पैकी १५४ गावांचे अंदाजपत्रके तयार आहेत. त्यांची किंमत ६ कोटी २५ लाख १४ हजार रुपये आहे. ब - वर्गवारी मधील १४० पैकी ९ गावांची अंदाजपत्रके तयार आहेत. त्यांची किंमत २० लाख ३ हजार रुपये आहे. ही अंदाजपत्रके १५  व्या वित्त आयोग निधी अंतर्गत तयार केली आहेत.  नळ योजना नसलेल्या ४६ पैकी ७ गावांत योजना आहेत. उर्वरित ३९ पैकी ७  गावांची अंदाजपत्रके तयार आहेत. त्यांची एकूण किंमत २ कोटी ८७ लाख ४५ हजार रुपये आहे. २०२०-२१ मध्ये ३४ नवीन योजनांचे उदिष्ट आहे. त्यापैकी ९ योजनांची अंदाजपत्रके विभागास प्राप्त झाली आहेत,’’ असे मुगळीकर यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com