हिळ्ळीत भीमा नदी कोरडी

हिळ्ळीत भीमा नदी कोरडी
हिळ्ळीत भीमा नदी कोरडी

अक्कलकोट : हिळ्ळी (ता. अक्कलकोट) येथील भीमा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अक्कलकोट तालुक्‍यात हिंगणी, आळगी, खानापूर आणि हिळ्ळी हे बंधारे आहेत. त्याच्या अलीकडील बाजूस महाराष्ट्राच्या हद्दीतील अनेक गावे येतात. या गावांना पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण भरून अतिरिक्‍त झालेल्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरवर्षी साधारणतः ऑगस्टमध्ये उजनी पूर्ण भरते. अतिरिक्‍त पाणी पुढे सोडले जाते. यावर्षी धरण कधी भरणार व पाणी पुढे कधी सोडणार, याची वाट शेतकरी पाहात आहेत. उजनी धरणातून पुरेशा पाण्याअभावी उन्हाळ्यात सोडलेले दुसरे आवर्तन हिळ्ळीपर्यंत येऊ शकले नाही. यामुळे पहिल्या आवर्तनाच्या पाण्यावरच कसेबसे दिवस घालवावे लागत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com