सात लोकसभा मतदारसंघांसाठी १८४ उमेदवारांचे अर्ज

सात लोकसभा मतदारसंघांसाठी १८४ उमेदवारांचे अर्ज
सात लोकसभा मतदारसंघांसाठी १८४ उमेदवारांचे अर्ज

मुंबई  : पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांत उमेदवारांची अक्षरश: भाऊगर्दी झाली आहे. सातही मतदारसंघांत एकूण १८४ उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आज (ता. २८) संपत आहे. ही मुदत संपल्यानंतरच पहिल्या टप्प्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

राज्यात चार टप्प्यांत लोकसभा निवडणूक होत असून, यापैकी पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम मतदारसंघात येत्या ११ एप्रिलला मतदान होईल. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २५ मार्चला संपली. या मुदतीत सात मतदारसंघांतून १८४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले  आहेत. 

मतदारसंघनिहाय प्रमुख उमेदवार ः वर्धा : रामदास तडस (भाजप), चारुलता टोकस (काँग्रेस), शैलेशकुमार अग्रवाल (बसप)

रामटेक : कृपाल तुमाने (शिवसेना), किशोर गजभिये (काँग्रेस), किरण रोडगे (वंचित बहुजन आघाडी), सुभाष गजभिये (बसप)

नागपूर : नितीन गडकरी (भाजप), नाना पटोले (काँग्रेस), करीम गफार पटेल (एमआयएम), मोहम्मद जमाल (बसप)

भंडारा-गोंदिया : नाना पंचबुद्धे, अनिल बावनकर (राष्ट्रवादी काँग्रेस), परिणय फुके, सुनील मेंढे (भाजप), कारू नान्हे (वंचित बहुजन आघाडी)

गडचिरोली-चिमूर : अशोक नेते (भाजप), डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस) हरिश्चंद्र मंगराम, पवन मागरे (बसप), रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी)

चंद्रपूर : हंसराज अहिर (भाजप), सुरेश धानोरकर (काँग्रेस), राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी), सुशील वासनिक (बसप)

यवतमाळ-वाशिम : भावना गवळी (शिवसेना), माणिकराव ठाकरे (काँग्रेस), अरुण किनवटकर (बसप), प्रवीण पवार (वंचित बहुजन आघाडी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com