जोरदार शक्तिप्रदर्शनाने डाॅ. सुजय विखेंचा उमेदवारी अर्ज दाखल

सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नगर   : नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी तो स्वीकारला. 

या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आमदार मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, माजी आमदार अनिल राठोड, भाजपचे जिल्हाअध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे उपस्थित होते. 

सकाळी दहा वाजता दिल्लीगेटपासून मोठ्या संख्येने रॅली काढण्यात आली. दिल्लीगेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली नेण्यात आली. या वेळी भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन केले. खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्यासह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. डाॅ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. डाॅ. विखे यांच्या समर्थनार्थ महायुतीचे कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   खासदार दिलीप गांधींची उपस्थिती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी कापून ती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना दिली. त्यामुळे गांधी नाराज होते. तसा संतापही त्यांनी अनेक वेळा उपस्थित केला होता; पण काही उपयोग झाला नाही. समर्थकांचा मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट केली आणि विखे यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार दिलीप गांधी यांनी डॉ. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली. आता त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांची भूमिका काय असेल, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com