Agriculture news in Marathi, Non-cooperation movement of Gramsevak from today | Agrowon

ग्रामसेवकांचे आजपासून असहकार आंदोलन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

अकोला ः ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामसेवक संघटनेने राज्यात आजपासून (ता. ९) असहकार आंदोलन जाहीर केले आहे. २४ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन विविध टप्प्यांवर केले जाणार आहे. याबाबत ग्रामसेवक संघटनेच्या प्रदेश तसेच जिल्हा संघटनांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अवगत केले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.

अकोला ः ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामसेवक संघटनेने राज्यात आजपासून (ता. ९) असहकार आंदोलन जाहीर केले आहे. २४ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन विविध टप्प्यांवर केले जाणार आहे. याबाबत ग्रामसेवक संघटनेच्या प्रदेश तसेच जिल्हा संघटनांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अवगत केले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.

राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. गावपातळीवर समकक्ष काम करणाऱ्या राज्य शासन, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ग्रामसेवकांना अधिक काम असतानाही इतरांच्या तुलनेत वेतनात असमानता आहे. पदोन्नतीची संधी नाही. इतर फायदेसुद्धा मिळत नाहीत. इतर विभागांच्या अनेक कामांसाठी ग्रामसेवकांवर सक्ती केली जाते. ग्रामसेवक तणावग्रस्त होऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. शासनाने ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत विचार न केल्याने आंदोलन छेडण्यात आले आहे. समान काम-समान दाम, समकक्ष पदे-समान वेतनश्रेणी, ग्रामसेवकांच्या शैक्षणिक अर्हता बदल करणे, लोकसंख्या आधारित ग्रामविकास अधिकारी पदात वाढ करणे, वेतनत्रुटी दूर करणे, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ देणे, ग्रामसेवक युनियनचे महाअधिवेशन घेणे, अतिरिक्त कामे कमी करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. 

याबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ ढाकणे, कोशाध्यक्ष निकम, विभागीय सहसचिव शेख चॉंद कुरेशी, डॉ. उल्हास मोकळकर यांच्यासह प्रत्येक जिल्हा संघटनांनी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे.

असे होईल आंदोलन
९ ऑगस्ट ः राज्यातील पंचायत समित्यांसमोर धरणे आंदोलन. 
१३ ऑगस्ट ः जिल्हा परिषदांसमोर धरणे.
१६ ऑगस्ट ः विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर आंदोलन. 
१८ ऑगस्ट ः पालकमंत्र्यांच्या घरासमोर एकदिवसाचे उपोषण. 
२२ ऑगस्ट ः असहकार आंदोलन करून त्यानंतर कामबंद आंदोलन सुरू होईल.
२४ ऑगस्ट ः ग्रामविकास मंत्री, प्रधान सचिवांच्या घरासमोर एक दिवसाचे उपोषण.


इतर ताज्या घडामोडी
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...
यवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी...यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी...यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे...
आंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक...
नीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही...
चारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन,...सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या...
पशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या...कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन...
पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे निधन कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग...