agriculture news in marathi, Non-cooperation Movement of Parbhani Traders | Agrowon

परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या चार अडत व्यापाऱ्यांवरील परवाने रद्दची कारवाई थांबवावी, या मागणीसाठी मार्केट व्यापारी महासंघाने मंगळवारपासून (ता. १८) सुरू केलेले असहकार आंदोलन चौथ्या दिवशी शुक्रवारी (ता. २१) देखील सुरू होते. त्यामुळे भुसार मालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होते. अडत व्यापाऱ्यांचा बंद, तसेच शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या चार अडत व्यापाऱ्यांवरील परवाने रद्दची कारवाई थांबवावी, या मागणीसाठी मार्केट व्यापारी महासंघाने मंगळवारपासून (ता. १८) सुरू केलेले असहकार आंदोलन चौथ्या दिवशी शुक्रवारी (ता. २१) देखील सुरू होते. त्यामुळे भुसार मालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होते. अडत व्यापाऱ्यांचा बंद, तसेच शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी अडत दुकांनाची तपासणी केली असता हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करत असल्याचे आढळून आल्यामुळे चार व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, असे आदेश बाजार समितीला दिले होते.परंतु व्यापारी बाजार समितीच्या नियमानुसार खरेदी- विक्रीचे व्यवहार करत असताना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी अडत दुकानांवर धाड सत्र सुरू केले आहे. व्यापारीवर्गाचे म्हणणे न ऐकता चार व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले, तर बाजार समितीअंतर्गतचे सर्व परवानाधारक व्यापारी बाजार समितीकडे परवाने जमा करतील. या व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत अडत दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे परभणी मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन, उपाध्यक्ष गोविंदप्रसाद अजमेरा यांनी बाजार समितीचे सभापती, तसेच सचिव यांना निवेदनाद्वारे कळविले होते.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून शेतीमालाची खरेदी बंद आहे. हमीभाव खरेदी केंद्रही सुरू नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना शेतीमालाची खरेदी सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, खरेदी सुरू न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीस दिले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...