सहकारमंत्र्यांच्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध

Non-election of co-operative minister's factory
Non-election of co-operative minister's factory

कऱ्हाड : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २१ जागांसाठी १४५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी २१ अर्जच शिल्लक राहिले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. त्याबद्दल सहकारमंत्री पाटील यांनी अर्ज मागे घेऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती. त्यासाठी कऱ्हाड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली या गटांसह अन्य प्रवर्गातून १४५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहकारमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी इच्छुकांनी गर्दी केली. काही गटांतील इच्छुकांनी पाटील यांना तुम्ही निर्णय घ्या, असे सुचवले. काही ठिकाणी पाटील यांना मध्यस्थी करावी लागली. सहकारमंत्री पाटील यांच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिला. २१ उमेदवारांसह अन्य इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. 

पाटील म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचाराने बिनविरोध झाली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माझ्यावर सहकार खात्याची जबाबदारी दिली. त्यानंतर काही दिवसांतच कारखान्याची निवडणूक लागली. सभासदांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याने निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यातून कारखान्याचे ४२ लाख रुपये वाचले आहेत. 

संचालकांत यांचा समावेश...

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्यांमध्ये सहकारमंत्री शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, जशराज पाटील (कऱ्हाड), रामचंद्र पाटील (तांबवे), माणिकराव पाटील (घोणशी), सुरेश माने (चरेगाव), बजरंग पवार (बेलवडे हवेली), सर्जेराव खंडाईत (पाल), दत्तात्रय जाधव ( उंब्रज), रामदास पवार (विरवडे), शंकर चव्हाण (कोपर्डे हवेली), मानसिंगराव जगदाळे (मसूर), संतोष घार्गे (वडगाव-जयरामस्वामी), लालासाहेब पाटील (कवठे), कांतीलाल भोसले (तारगाव), वसंत कणसे (पिंपरी), अविनाश माने (रहिमतपूर), शारदा पाटील (नडशी), लक्ष्मी गायकवाड (वाठार किरोली), जयवंत थोरात (हिंगनोळे), लहू जाधव (मसूर) व संजय कुंभार (नांदगाव-सातारा) यांचा समावेश आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com