विनाअनुदान गॅस ६२ रुपयांनी स्वस्त

लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची टंचाई जाणवू नये यासाठी सर्वसामान्यांची धावपळ सुरू असताना स्वयंपाकांच्या विनाअनुदान गॅस सिलिंडरचे (एलपीजी) दर जवळपास ६२ रुपयांनी कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
विनाअनुदान गॅस ६२ रुपयांनी स्वस्त
विनाअनुदान गॅस ६२ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची टंचाई जाणवू नये यासाठी सर्वसामान्यांची धावपळ सुरू असताना स्वयंपाकांच्या विनाअनुदान गॅस सिलिंडरचे (एलपीजी) दर जवळपास ६२ रुपयांनी कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या १२ सिलिंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते. याव्यतिरिक्त सिलिंडरची गरज भासल्यास खुल्या बाजारातून खरेदी करावी लागते. या सिलिंडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडले असल्यामुळे त्यात चढउतार होत असते. आता संचारबंदीच्या काळात सिलिंडरची मागणी पाहता सरकारी तेल कंपन्यांनी विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६२ रुपयांची कपात केली आहे. यामुळे १४.२ किलो ग्रॅमचे एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले आहे. दिल्लीत ६१.५० रुपयांनी दर घटले असून सुधारीत दर ७४४ रुपये असेल. तर मुंबईमध्ये ६२ रुपये किंमत कमी झाल्यामुळे दर ७१४.५० रुपये असेल. तर कोलकाता आणि चेन्नईमधील सुधारीत दर अनुक्रमे ७४४.५० रुपये आणि ७६१.५० रुपये असेल. यासोबतच व्यावसायिक वापर होणाऱ्या १९ किलोग्रॅम सिलिंडरचे दरही ९६ रुपयांनी कमी करण्यात आले आहे. दिल्लीत या सिलिंडरच्या दरात १३८१.५० रुपयांवरून १२८५.५०रुपये कपात करण्यात आली आहे. तर मुंबईत हा दर १२३४.५० रुपये असेल. कोलकाता आणि चेन्नईमध्ये या सिलिंडरचे सुधारीत दर १३४८.५० रुपये आणि १४०२ रुपये असेल. त्याचप्रमाणे सिलिंडरची नोंदणी १५ दिवसांनीही करण्याची मुभा ग्राहकांना देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com