agriculture news in Marathi, Normal and heavy rain in state, Maharashtra | Agrowon

राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

पुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २०) दिवसभर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मध्य महाराष्ट्रातही पुणे, नगर, उत्तर दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी विदर्भातील वेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद, अकोला, नागपूर येथे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. 

पुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २०) दिवसभर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मध्य महाराष्ट्रातही पुणे, नगर, उत्तर दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी विदर्भातील वेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद, अकोला, नागपूर येथे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. त्यामुळे अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत चिपळून येथे सर्वाधिक १०१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकणातील कुलाबा, लांजा, वाडा, रामेश्वर, पालघर, विक्रमगड येथेही जोरदार पाऊस पडला. तर अनेक भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत होत्या. तसेच घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडला. नगरमधील अकोले येथे सर्वाधिक ८८ मिलिमीटर पाऊस पडला. तर राहुरी, इगतपुरी, करमाळा, श्रीरामपूर, संगमनेर, चाळीसगाव, चांदवड, सटाना, दहीवडी, बार्शी या भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, अनेक भागांत हवामान ढगाळ होते. तर काही भागांत अधूनमधून सरी पडत होत्या. मराठवाड्यातील पैठण येथे सर्वाधिक ७२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर गंगापूर, औरंगाबाद, सोयगाव, अंबाजोगाई, जाफ्राबाद, कंधार, मानवत, पूर्णा, पाथरी येथेही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. विदर्भातील लोणार येथे ४७.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर तेल्हारा, लांखंदूर, साकोळी,  चिखली, खामगाव, मेहकर, सिंदखेड राजा, रिसोड येथेही मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळ्याने खरिपातील तूर पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.    

पावसाचा जोर वाढणार 
अरबी समुद्र ते उत्तर महाराष्ट्र यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)  
कोकण ः कुलाबा ८१, म्हापसा २०.३, जव्हार २२, पालघर ४३, विक्रमगड ४३, वाडा ८४, माथेरान २०.३, पेण ३५, सुधागडपाली ३८, तला २०, चिपळून १०१, खेड २०, लांजा ९२, दोडामार्ग ५५, रामेश्वर ५४, सावंतवाडी ४४, वैभववाडी ३५, शहापूर २५, ठाणे ३२, 
मध्य महाराष्ट्र ः अकोले ८८, जामखेड ३५, नेवासा ४२, पारनेर ३०, राहाता २५, पाथर्डी २०, राहुरी ६६.८, संगमनेर ४२, सावळीविहार ३०.५, शेवगाव ५२, श्रीरामपूर ४८,  साक्री ३१, चाळीसगाव ४८, बोदवड ३५, धरणगाव २०, चांदगड २९, गगनबावडा २३, पन्हाळा २५, शहादा २९, चांदवड ४७, इगतपुरी ६०, मालेगाव ३८, सटाना ३९,  सिन्नर ३३, सुरगाना २२, येवला २४, बारामती २३, जुन्नर २८, खेड २१, विटा २१, दहीवडी ४०, जावळी मेढा २५, बार्शी ३३, करमाळा ५५, मंगळवेढा २५, 
मराठवाडा ः औरंगाबाद ४५.१, गंगापूर ५१, कन्नड २६, पैठण ७२, सिल्लोड ३९, सोयगाव ४०, अंबाजोगाई ३१, माजलगाव २८, पाटोदा ३९, औढा नागनाथ ३५, वसमत २७, बदनापूर ३०, भोकरदन २६, जाफ्राबाद ४६, जालना २८, मंठा २०, परतूर २१, औसा ३९, अर्धापूर ८५, भोकर २७, बिल्लोली २२, कंधार ५३, लोहा ४५, मुदखेड ३९, नायगाव २३, नांदेड ३०, उमरगा २८, भूम २८, कळंब ३५, वाशी २२, परभणी ३०, मानवत ४५, पाथरी ५९, पूर्णा ६६, सेलू ३२, सोनपेठ ४१, 
विदर्भ ः तेल्हारा ३०, लांखंदूर २९, साकोळी ३०, बुलडाणा २४.७, चिखली २८.४, खामगाव ३१.२, लोणार ४७.५, मेहकर ३४.९, मोताळा २०.४, सिंदखेड राजा ३३.५, देसाईगंज २१, रिसोड २९.५.

इतर अॅग्रो विशेष
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...