agriculture news in Marathi, normal monsoon possibilities in country, Maharashtra | Agrowon

देशात माॅन्सूनचे चांगले वितरण होण्याचे संकेत : हवामान विभाग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मॉन्सूनचे प्रमाण घटविणाऱ्या आणि दुष्काळाला कारणीभूत मानल्या जाणाऱ्या ‘एल-निनो’ या प्रशांत महासागरातील घटकाचा प्रभाव यंदा नगण्य राहील. साहजिकच मॉन्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. जूनमध्ये एल-निनोचा परिणाम जाणवेल, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये तो निष्क्रीय झालेला असेल. मॉन्सून चांगला राहणार असल्याने चिंतेचे काहीही कारण नाही. ‘मे’चा अंतिम आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुधारीत अंदाज जाहीर केला जाईल.
- डॉ. एम. राजीवन, सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय,

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. १५) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरवातीला एल-निनो स्थिती कमकुवत राहणार असून, शेवटच्या टप्प्यात तीव्रता आणखी कमी होण्याचे संकेत आहेत. देशात मॉन्सूनचे चांगले वितरण होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. यंदाचा माॅन्सून सर्वसाधारण स्वरूपाचा राहण्याच्या पूर्वानुमानामुळे दिलासादायक चित्र यंदा पाहण्यास मिळेल, अशी आशा कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९५१ ते २००० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८९ सेंटिमीटर म्हणजेच ८९० मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३९ टक्के), तर दुष्काळाची शक्यता १७ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या ९१ टक्के (उणे ९ टक्के) पाऊस पडला होता. यंदा देशात सर्वत्र पावसाचे चांगले वितरण अपेक्षित असून, खरीप हंगामात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

आयएमडीकडून दोन टप्प्यांत हवामानाचे पूर्वानुमान वर्तविण्यात येते. यात एप्रिल महिन्यात प्राथमिक तर जून महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज दिला जातो. उत्तर ॲटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे डिसेंबर व जानेवारी महिन्यातील तापमान, हिंदी महासागराच्या विषुववृत्ताजवळील पृष्ठभागाचे फेब्रुवारी महिन्यातील तापमान, पूर्व आशियातील फेब्रुवारी व मार्च महिन्यांतील समुद्रसपाटीवरील हवेचा दाब, वायव्य युरोपमधील भूपृष्ठावरील हवेचे जानेवारी महिन्यातील तापमान व प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील फेब्रुवारी व मार्च महिन्यातील उष्ण पाण्याचे प्रमाण या घटकांच्या नोंदी विचारात घेऊन, ‘स्टॅटेस्टिकल एनसेंबल फोरकास्टिंग सिस्टिम’(एसईएफएस) चा वापर करून अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सौम्य एल-निनो स्थिती
विषुुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ ते १ अंशांनी अधिक असल्याने या भागात सध्या सौम्य एल-निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन माॅडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार असून, शेवटच्या टप्प्यात तीव्रता आणखी कमी होण्याचे संकेत आहेत. जून महिन्यातील एल-निनो अंदाजाच्या तुलनेत फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तयार पूर्वानुमानात अनिश्चितता अधिक असते, असे दिसून आले आहे. तर बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य आहे. माॅन्सून हंगामात आयओडी सकारात्मक राहणार असून, याचा थेट संबंध देशातील सर्वसधारण पावसाशी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मॉन्सून मिशन मॉडेलनुसार  ९४ टक्के पाऊस
आयएमडीच्या डायनानिकल कपल्ड ओशन-ॲटमॉस्फिअर ग्लोबल क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टिमनुसार (सीएफएस) यंदाच्या मॉन्सून हंगामात ९४ टक्के पावसाची शक्यता आहे. या पूर्वानुमानातही ५ टक्के कमी अधिक तफावतीची शक्यता आहे.पूर्वानुमानात मार्च महिन्यापर्यंतची वातावरणीय आणि महासागरातील स्थिती दर्शविणारे ४७ घटक विचारात घेण्यात आले असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.  

मॉन्सूनचे प्रमाण घटविणाऱ्या आणि दुष्काळाला कारणीभूत मानल्या जाणाऱ्या ‘एल-निनो’ या प्रशांत महासागरातील घटकाचा प्रभाव यंदा नगण्य राहील. साहजिकच मॉन्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. जूनमध्ये एल-निनोचा परिणाम जाणवेल, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये तो निष्क्रीय झालेला असेल. मॉन्सून चांगला राहणार असल्याने चिंतेचे काहीही कारण नाही. ‘मे’चा अंतिम आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुधारीत अंदाज जाहीर केला जाईल.
- डॉ. एम. राजीवन, सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय,

फोटो गॅलरी

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...