agriculture news in Marathi normal rain in Kokan and central Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत पावसाचा शिडकावा होत आहे. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाड्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे.

पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत पावसाचा शिडकावा होत आहे. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाड्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. रविवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोल्हापुरातील गगनबावडा येथे ९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. दिवसभर राज्यातील काही भागांत हवामान ढगाळ होते आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत होत्या. नद्यांच्या पाणीपातळीत घट झाल्याने धरणातील पाणीसाठाही स्थिरावला आहे. 

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या भागात शनिवारी रात्री तुरळक ठिकाणी हलक्या पडल्या. पालघरमधील जव्हार येथे ५१ मिलिमीटर पाऊस पडला. तर पालघर, वाडा, भिरा, महाड, माथेरान, लांजा येथे मध्यम स्वरूपाचा तर, दिवसभर बहुतांशी भागात पाऊस नव्हता. त्यामुळे नद्या नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाला होता. मात्र, भात खाचरांत काही प्रमाणात पाणी कायम होते. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, सांगली, नगर या भागातही पावसाचा जोर ओसरला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाल्याने पूरस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी(ता.) दुपारी पंचगंगा नदीची पातळी धोका पातळीपेक्षा दोन इंचाने कमी राहिली. याच बरोबर राधानगरी धरणातून होणारा विसर्ग ही थांबला आहे. यामुळे पाणी दोन दिवसांत ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे, सातारा भागातील धरणातून विसर्ग घटल्याने नदीच्या पाणी पातळीत येत्या दोन दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम भाग वगळता जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात थांबून थांबून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. सोलापूर, नगर, नाशिक, खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात हवामान ढगाळ आहे. 

मराठवाड्यातील औंरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात ऊन पडल्याचे चित्र होते. शनिवारी रात्री तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. गोंदियातील सडकअर्जुनी येथे ७६.६ मिलिमीटर पाऊस पडला. 

कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा 
अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. हे क्षेत्र मध्य प्रदेश व ओडिशाकडे सरकणार असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. कर्नाटकाच्या पश्चिम किनाऱ्यावर एक द्रोणीय स्थिती तयार होणार आहे. याशिवाय उत्तर भारतातील मॉन्सूनचा पट्टा बिकानेर, पिलानी, दिल्ली, गया आणि बंगालचा उपसागर, ओडिशा, आंध्र प्रदेश या दरम्यान आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. आजपासून (ता.१०) कोकण, विदर्भात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये) 
कोकण :
डहाणू ३२.५, जव्हार ५१, पालघर ४३.४, वाडा ३७, भिरा ३३, महाड ४१, माथेरान ३४.४, लांजा ४८, सावंतवाडी ३८. 
मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ९०, पन्हाळा ३२, राधानगरी ३३, शाहूवाडी २०, अक्कलकुवा २०, नवापूर ४२, हर्सूल २०, इगतपुरी ६५, सुरगाणा २०.१ पेठ २५, त्र्यंबकेश्वर २०.१, लोणावळा कृषी ४३, वेल्हे २५, महाबळेश्वर ४८.४. 
विदर्भ : लाखंदूर १४.२, पवनी १५.२, साकोली १७, ब्रह्मपुरी १७.३, अरमोरी १९.२, भामरागड १०.२, देसाईगंजवडसा ४१, धानोरा ३३.३, एटापल्ली १५, गडचिरोली १२.५, कोर्ची ३१.७, कुरखेडा ४४.१, सिरोंचा १५.२, आमगाव २९.५, अर्जुनीमोरगाव २५.९, देवरी ६३.३, गोंदिया २१.९, गोरेगाव ५५.२, सडकअर्जुनी ७६.६, सालकेसा ३२, तिरोडा २६, भिवापूर ११.४, कुही १८.२ 


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...