agriculture news in Marathi, normal rain possibilites in state, Maharashtra | Agrowon

राज्यात तुरळक पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे : पोषक हवामानाअभावी राज्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाची उघडीप आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, बुधवारपर्यंत (ता. १४) राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, माॅन्सनचा आस असलेल्या कमी दाब पट्ट्याचा पश्‍चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकला आहे, तर पूर्वेकडील भाग सर्वसाधारण स्थितीमध्ये आहे. पुढील पाच दिवस हीच स्थिती राहणार असल्याने उत्तर भारतातील राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार अाहे. तर आठवडाभर राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल.

पुणे : पोषक हवामानाअभावी राज्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाची उघडीप आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, बुधवारपर्यंत (ता. १४) राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, माॅन्सनचा आस असलेल्या कमी दाब पट्ट्याचा पश्‍चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकला आहे, तर पूर्वेकडील भाग सर्वसाधारण स्थितीमध्ये आहे. पुढील पाच दिवस हीच स्थिती राहणार असल्याने उत्तर भारतातील राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार अाहे. तर आठवडाभर राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल.

मंगळवारी (ता. १३) बंगालच्या उत्तर भागात नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच १३ ते १५ ऑगस्ट रोजी मॉन्सूनचे प्रवाह सक्रीय होऊन कोकण, घाटमाथा, केरळ, कर्नाटकमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता अाहे. 
शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मराठवाडा, विदर्भात मुख्यत: कोरडे हवामान होते.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये, स्राेत- कृषी विभाग) : 
कोकण : भाईंदर २२, धसई २१, महाड २३, बिरवडी २६, नाटे २५, खारवली २३, खामगाव २२, मेंढा ३१, दाभाेळ २१, अबलोली २०, सावंतवाडी २१, आंबोली ३५, तलेरे २६, कडूस २२, कोणे २२.
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३५, घोटी २१, धारगाव ३२, वेळुंजे २१, शेंडे ६१, माले २३, मुठे २६, लोणावळा २३, राजूर २१, हेळवाक २६, तापोळा ५७, लामज ७२, आंबा ४७, राधानगरी २२, गगणबावडा ४३, साळवण ८१.
 मराठवाडा : मंथा २१, बामणी १५, चारठाणा १६.
विदर्भ : मेरा २४, धूळघाट ३१, सावळीखेडा २२, नांदगाव २३, लोणी २०, रोहणा २८.


इतर अॅग्रो विशेष
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...
भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढकोल्हापूर: कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या...
वऱ्हाडात जोरदार, मराठवाड्यात सर्वदूर...पुणे ः राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात...
`सीसीआय`कडून सहा कोटी क्विंटल कापूस...नागपूर : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय)...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...