agriculture news in marathi, normal rain possibilities in state, Maharashtra | Agrowon

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे: कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (ता.१) कोकणात काही ठिकाणी तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. छत्तीसगडसह पूर्व भारतामध्ये झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने १३० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.  

पुणे: कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (ता.१) कोकणात काही ठिकाणी तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. छत्तीसगडसह पूर्व भारतामध्ये झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने १३० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.  

महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये वाऱ्यांचे पूर्व पश्‍चिम जोडक्षेत्र आहे. तर माॅन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. यामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात पाऊस वाढणार असून, महाराष्ट्रसह दक्षिणेकडील राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारपासून (ता. २) कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुन्हा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकण, पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. उर्वरीत राज्यात मुख्यत: कोरडे हवामान होते. 

बुधवारी (ता.२९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) : 
कोकण : शिरगांव ३२, अंबवली ३२, धामनंद ३५, देवळे ३१, तुलसानी ३७, राजापूर ३३, सवंडल ३०, कुंभवडे ३१, पाचल ४८, सातवली ४५, बांदा ३५, आजगाव ३२, अंबोली ३५, वेंगुर्ला ३२, शिरोडा ५२, फोंडा ३२, वैभववाडी ३७, येडगाव ५७, भुइबावडा ४४, भेडशी ३५. 
मध्य महाराष्ट्र : मंद्रूप ३२, निंबार्गी ५८, विंचूर ४५, मंगळवेढा ३०, तापोळा ४५, लामज ६०, आंबा ४१, राधानगरी ५७, कसबा ३०, चंदगड ३८. 
मराठवाडा : अंबाजोगाई २२, होळ ३४, धारूर २२. 
विदर्भ : देवळापूर ३५, मोहाडी ३२, वार्थी ३५, केरडी ६७, केंद्री ४२, नाकडोंगरी ७६, तुमसर ५७, शिवरा ७५, मिटेवणी ५६, गाऱ्हा ४७, साकेली ३४, गंगाझारी ६९, रत्नारा १२२, दासगाव ११०, गोंदिया ३९, खामरी ४३, काट्टीपूर ७३, आमगाव ३९, ठाणा ४०, परसवाडा ९०, तिरोडा ५६, मुंडीकोटा ७०, वाडेगाव ५४, ठाणेगाव ६९, सौदाद ३२, दारव्हा ३०, सिरोंचा ३६, कोर्ची ३६, बेडगाव ३२, कोटगुळ ३९.

इतर अॅग्रो विशेष
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...