विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

विदर्भात हलक्या पावसाची शक्यता
विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने फेब्रुबारी महिन्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. मालेगाव येथे रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २५) राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या वर गेले आहे. कोकणातील सांताक्रूझ, रत्नागिरी येथेही तापमान पस्तिशीपार झाले असून, उन्हाचा ताप वाढला आहे. राज्यात रात्रीचे किमान तापमानाही १६ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी कमी झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका असह्य होत असतानाच उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. २५) रात्रीच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.  ओडिशापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत सक्रिय असलेला हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. रविवारी दुपारी दक्षिण गुजरात, मध्य प्रदेशसह धुळे, नंदूरबार परिसरांवर ढग जमा झाले होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अंशत: ढगाळ हवामान झाले होते. आज (ता. २५) विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रविवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२ (१६.६), जळगाव ३२.६ (१६.६), कोल्हापूर ३६.३ (२२.१), मालेगाव ३९.२(१९.६), नाशिक ३५.४ (१५.५), सांगली ३७.६ (१८.०), सातारा ३५.५ (१७.८), सोलापूर ३८.४ (२१.७), अलिबाग २९.९ (१८.८), डहाणू २९.९ (१९.६), सांताक्रूझ ३५.४ (१९.२), रत्नागिरी ३५.५ (२०.६), औरंगाबाद ३५.४ (१६.०), बीड ३८.० (१९.०), नांदेड ३७.५ (१९.५), उस्मानाबाद - (१९.७), परभणी ३७.९ (२०.४), अकोला ३७.५ (१९.०), अमरावती ३८.४ (१९.०), बुलडाणा ३३.६ (१९.६), चंद्रपूर ३७.६ (१८.२), गोंदिया ३५.७ (२१), नागपूर ३६.७ (१८.२), वर्धा ३६.९ (१९.७). यवतमाळ ३७.० (२१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com