agriculture news in Marathi normal rain possibility in August and September Maharashtra | Page 2 ||| Agrowon

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता : हवामान विभाग

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के, तर सप्टेंबरमध्ये (एकत्रित) ९५ ते १०५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस पडणार आहे.

पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा हवामान अंदाज सोमवारी (ता.२) जाहीर केला. ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के, तर सप्टेंबरमध्ये (एकत्रित) ९५ ते १०५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस पडणार आहे. तर राज्यात दोन्ही महिन्यांत पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. यंदा हवामान विभागाने १६ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात ९८ टक्के, तर दुसऱ्या टप्यात जूनमध्ये १०१ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दर महिन्याच्या अंदाजामध्ये जून महिन्यात देशात ९२ ते १०८ टक्के, जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. 

मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन महिन्यांत देशात ९५ ते १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात देशाच्या वायव्य, पूर्व आणि ईशान्य भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये बहुतांशी भागांत, तसेच महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशातील १९६१ ते २०१० कालावधीत मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२८.३ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. 

ऑगस्टमध्ये सर्वसाधारण पाऊस 
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून यंदा प्रत्येक महिन्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण म्हणजेच ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. १९६१ ते २०१० कालावधीत ऑगस्ट महिन्याची पावसाची दीर्घकालीन सरासरी २५८.१ मिलिमीटर आहे. ऑगस्टमध्ये मध्य आणि वायव्य भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य आणि मध्य भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

एल निनो स्थिती सर्वसाधारण 
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसाधारण एल निनो स्थिती असून, ती मॉन्सून अखेरपर्यंत कायम राहणार आहे. तर विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पूर्व आणि मध्य भागातील समुद्र थंड होत आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामानंतर ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. 

‘आयओडी’ नकारात्मक 
बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या तापमानातील फरकाचा (आयओडी – इंडियन ओशन डायपोल) मॉन्सूनच्या पावसावर प्रभाव पडतो. सध्या विषुववृत्तालगतच्या हिंद महासागरात नकारात्मक आयओडी स्थिती आहे. मॉन्सून हंगामाच्या शेवटपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. नकारात्मक आयओडी चांगल्या पावसासाठी पूरक मानला जातो. 

राज्याच्या काही भागांत पाऊस कमी राहणार 
महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात कोकण, घाटमाथा वगळता राज्याच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून, उत्तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागांत समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील कमी पावसाचा अंदाज दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे. 
 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...