agriculture news in Marathi normal rain possibility in kokan Maharashtra | Agrowon

कोकणात हलक्या पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे. आज (ता.२) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बिहार परिसरावर आहे. मध्य उत्तर प्रदेशमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हरियाना आणि परिसरावर असून ते निवळले जाणार आहे. नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून 
या दोन्ही कमी दाब क्षेत्रांमधून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. 

उत्तर भारतात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.३) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या सरींसह पावसाची उघडीप 
राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

येथे होणार जोरदार पाऊस 
सोमवार ः
संपूर्ण राज्यात तुरळक 
मंगळवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक 
बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक 
गुरुवार ः रायगड, रत्नागिरी, संपूर्ण राज्यात तुरळक 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

 • पुणे - २८.१ (०.५) 
 • जळगाव - ३१.५ (-०.१) 
 • कोल्हापूर - २५.८ (-०.६) 
 • महाबळेश्वर - १९.४ (-०.१) 
 • मालेगाव - ३०.८ (१.१) 
 • नाशिक - २७.३ (-०.५) 
 • सांगली - २७.४ (-१.०) 
 • सातारा - २६.० ( -०.४) 
 • सोलापूर - ३०.२ (-१.०) 
 • मुंबई (कुलाबा) - ३०.८ (१.०) 
 • अलिबाग - ३०.६ (०.९) 
 • रत्नागिरी - २९.१ (०.६) 
 • डहाणू - ३०.७ (०.६) 
 • औरंगाबाद - २९.१ (-०.१) 
 • परभणी - ३०.४ (-०.३) 
 • नांदेड- ३३.० (१.७) 
 • अकोला - ३०.० (-०.९), 
 • अमरावती - २८.४ (-१.८) 
 • बुलडाणा - २७.८ (-०.३) 
 • ब्रम्हपुरी - २८.९ (-१.८) 
 • चंद्रपूर - ३१.४ (०.८) 
 • गोंदिया - २८.४ (-२.६) 
 • नागपूर - २९.५ (-१.३) 
 • वर्धा - २९.० (-१.७) 
   

इतर अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...