agriculture news in Marathi normal rain possibility in kokan Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात आज हलक्या सरींची शक्यता 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता.३) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता.३) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरीसह, मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश आणि परिसरावर असून, ते मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे सरकत जाण्याची शक्यता आहे. हरियाना आणि परिसरावरही हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून, संगरूर, दिल्ली, सिधी, गया, मालदा ते त्रिपूरा, उत्तर बांगलादेशपर्यंत सक्रिय आहे. बांगलादेशाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्याने या भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. 

दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे उत्तर भारतात मॉन्सून सक्रिय राहणार आहे. तर दक्षिण भारतात मात्र पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. उद्या (ता.४) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पावसाला पोषक हवामान नसल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

येथे होणार जोरदार पाऊस 
मंगळवार ः
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक 
बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक 
गुरुवार ः रायगड, रत्नागिरी, संपूर्ण राज्यात तुरळक 
शुक्रवार ः संपूर्ण राज्यात तुरळक 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोमवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २७.८ (०.२) 
  • जळगाव - ३१.८ (०.२) 
  • कोल्हापूर - २६.८ (०.४) 
  • महाबळेश्वर - १९.० (-०.५) 
  • मालेगाव - ३०.८ (०.९) 
  • नाशिक - २६.९ (-०.९) 
  • सांगली - २६.३ (-२.१) 
  • सातारा - २६.० ( -०.४) 
  • सोलापूर - ३१.३ (०.१) 
  • मुंबई (कुलाबा) - ३०.४ (०.६) 
  • अलिबाग - ३०.२ (०.५) 
  • रत्नागिरी - २९.४ (०.९) 
  • डहाणू - ३१.१ (१.०) 
  • औरंगाबाद - २९.५ (०.३) 
  • परभणी - ३०.४ (-०.३) 
  • नांदेड- ३३.० (१.७) 
  • अकोला - ३१.४ (०.५), 
  • अमरावती - २८.४ (-१.८) 
  • बुलडाणा - २८.० (-०.१) 
  • ब्रम्हपुरी - २८.९ (-१.८) 
  • चंद्रपूर - ३०.८ (-०.३) 
  • गोंदिया - २९.८ (-१.२) 
  • नागपूर - २९.३ (-१.५) 
  • वर्धा - २९.२ (-१.५) 

इतर बातम्या
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...