agriculture news in Marathi normal rain possibility in several places Maharashtra | Agrowon

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ऊन पडत असले तरी काही वेळा ढगाळ हवामान तयार होऊन पावसाच्या सरी बरसत आहेत.

पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ऊन पडत असले तरी काही वेळा ढगाळ हवामान तयार होऊन पावसाच्या सरी बरसत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी अजूनही सावरलेला नसताना पुन्हा पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भात काढणी खोळंबल्या असून नुकसानीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. 

काही भागात अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. जोरदार पावसामुळे पिकांच्या नुकसानीमध्ये आणखी भर पडत आहे. शेतकरी चांगलाच हातघाईस आला असून रब्बीच्या तयारीसाठीही अडचणी पुढे राहिल्या आहेत. ऐन रब्बीच्या तोंडावर खरिपाचे नुकसान झाल्याने शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र 
मध्य महाराष्ट्रातही पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, नगर, कोल्हापूर भागात परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या पावसाने शेतकऱ्यांची आणखीनच चिंता वाढवली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. सोमवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापूर येथील बावडा येथे ७९.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे पिकांच्या नुकसानीमध्ये आणखी भर पडल्याने शेतकऱ्याचा धीर सुटत असल्याचे चित्र आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. काही भागात पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पाणी व ओलावा कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांची काढणी वेगाने सुरू केली आहे. 

मराठवाडा 
मराठवाड्यात काही भागात हलक्या सरी पडत आहे. मात्र, अनेक भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस काढणीस सुरूवात केली आहे. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातात पडणार नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. नुकसानग्रस्त भागात सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. परंतु त्याला फारसा वेग नसल्याने पंचनाम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

विदर्भ 
विदर्भातही पावसाचा चांगलाच फटका पिकांना बसला आहे. सततच्या पावसामुळे अजूनही शेतात ओल धरून असल्याने खरिपातील पिकांची काढणी खोळंबल्यात जमा आहे. काही ठिकाणी पाऊस नसल्याने काढणी सुरू झाली आहे. मात्र, नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे. त्यातच झालेला खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नसल्याने रब्बीची तयारी कशी करायची असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. 

सोमवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटर ः (स्रोत - हवामान विभाग) 
कोकणः अलिबाग २२, मुरूड १९, तळा ११. 
मध्य महाराष्ट्र : नगर ६०, चास ५१, कर्ज ५८, पारनेर ६१, राहुरी २४, संगमनेर २४, सावळीविहार ३६, शेवगाव २६,श्रीरामपूर १९, शिरूपूर ३८, चाळीसगाव २६, चोपडा २४, २७, देवळा १८, इगतपुरी २५, नाशिक ४५, निफाड ३४, येवला ६४, बारामती १९, खेड २६, पुणे ३२.६, पुरंदर ३०., शिरूर २२, पौड १५, जत २२, माळशिरस २९, मगळवेढा १३. 
मराठवाडा ः औरंगाबाद ११, वैजापूर १६, केज १२, शिरूर कासार ११, बदनापूर १०, जाफ्राबाद १३, उस्मानाबाद ५९. 
 


इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...