तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे ः मॉन्सूनची चाहूल लागली असतानाच अरबी समुद्र, केरळ ते महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे राज्यातील पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वारा सुटून पूर्वमोसमीच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.     कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ आहे. यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, नाशिक, औरंगाबाद या भागांत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी  पडल्या. उर्वरित भागातही गुरुवारी (ता. ६) दिवसभर हवामान ढगाळ होते. यामुळे उन्हाच्या चटका कमी झाला असून, उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. त्यामुळे या भागातील कमाल तापमान हे ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ब्रह्मपुरी येथे ४७.५ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली.  कोकणात ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली असून कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा काही अंशी कमी झाल्या आहेत. त्यामुळे या भागात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यात अजूनही सकाळपासून सूर्य तळपत आहे. यामुळे या भागात उन्हाचा चांगलाच चटका आहे. विदर्भात उष्णतेची लाट असल्याने अकोला, ब्रह्मपुरी, गोंदिया, नागपूर, वर्धा या शहरांचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर आहे.  गुरुवारी (ता. ६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) ः  पुणे ४०.१ (६.४), जळगाव ४३.० (२.६), कोल्हापूर ३८.७ (६.९), महाबळेश्‍वर ३३.३ (७.७), मालेगाव ४४.२ (६.९), नाशिक ३७.८ (२.३), सांगली ४०.४ (६.९) सातारा ४०.३ (८.१), सोलापूर ४२.२ (५.४), मुंबई (सांताक्रूझ) ३४.४ (१.२), मुंबई ३४.६ (१.४), अलिबाग ३२.० (-०.५), रत्नागिरी ३५.६ (४.०), डहाणू ३४.१ (-०.२), औरंगाबाद ४१.६ (४.८), बीड ३४.९ (-२.३), परभणी ४२.२ (२.९), नांदेड ४३.० (३.८), अकोला ४५.२ (५.२), अमरावती ४४.० (४.७), बुलडाणा ४१.० (४.८), ब्रह्मपुरी ४७.५ (७.०), 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com