हलक्या पावसाचा अंदाज

हलक्या पावसाचा अंदाज
हलक्या पावसाचा अंदाज

पुणे ः बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी (ता. ४) राज्यात पावसाने उघडीप दिली होती. आज (ता. ५) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कोकण, विदर्भात पावसाने जोर धरला होता. मात्र बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली.  बुधवारी अनेक ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. आज (ता. ५) राज्यात पाऊस उघडीप देणार आहे, तर मध्य प्रदेश आणि परिसरावर हवेचे ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी (ता. ४) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः हवामान विभाग)-  कोकण ः   पालघर, तलासरी, रोहा प्रत्येकी ८०, पोलादपूर ७०, चिपळूण ६०, लांजा, कुलाबा, मुलदे, कणकवली, उरण, गुहागर, कुडाळ, राजापूर, पेण, डहाणू प्रत्येकी ५०, भिरा, वैभववाडी, खेड, देवगड, मुरूड प्रत्येकी ४०, रत्नागिरी, सांताक्रूझ, मंडणगड, सावंतवाडी, म्हसळा, वसई, माणगाव, खालापूर, सुधागड पाली, महाड प्रत्येकी ३०. मध्य महाराष्ट्र ः  महाबळेश्वर ७०, लोणावळा, राधानगरी प्रत्येकी ६०, पाचोरा, गगनबावडा, पारोळा प्रत्येकी ५०, शिरपूर, आजरा, अक्कलकुवा प्रत्येकी ४०, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा, चंदगड, भडगाव, पन्हाळा प्रत्येकी ३०. मराठवाडा ः जालना, जाफ्राबाद प्रत्येकी ९०,  भोकरदन ८०, माहूर, अहमदपूऱ, बिलोली, धर्माबाद प्रत्येकी ५०, कंधार, कन्नड प्रत्येकी ४०, सोनपेठ, गंगाखेड, सिल्लोड प्रत्येकी ३०. विदर्भ ः धानोरा ६०, चिखलदरा ५०, एटापल्ली, सावळी, तिरोडा, गोंदिया, चामोर्शी, धारणी, अरमोरी, मूल, मूलचेरा प्रत्येकी ३०. घाटमाथा ः कोयना नवजा १९०, ताम्हणी ७०, शिरगाव, डुंगरवाडी प्रत्येकी ५०, कोयना पोफळी ४०, खोपोली, दावडी, आंबोणे, वळवण, लोणावळा प्रत्येकी ३०. मॉन्सूनची प्रगती सुरूच नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) उत्तरेकडील प्रगती मजल-दरमजल सुरूच आहे. गुरुवारी (ता. ४) मॉन्सूनने संपूर्ण गुजरात, मध्य प्रदेश व्यापून, राजस्थानच्या काही भागांत प्रगती केली आहे. शुक्रवारपर्यंत देशाच्या आणखी काही भागांत वाटचाल शक्य असून, मॉन्सून लवकरच देश व्यापणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com