agriculture news in Marathi, normal rain possibility in state, Maharashtra | Agrowon

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे. तापमान ३६ अंशांपार गेल्याने कोकणात ऊन अधिकच तापदायक ठरत आहे. बुधवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॉन्सून देशभरातून परतल्यानंतर आजपासून (ता. १७) पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   

पुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे. तापमान ३६ अंशांपार गेल्याने कोकणात ऊन अधिकच तापदायक ठरत आहे. बुधवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॉन्सून देशभरातून परतल्यानंतर आजपासून (ता. १७) पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   

पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ चांगलीच वाढली आहे. मुंबईतील सांताक्रुझ, कुलाबासह, कोकणातील अलिबाग येथेही ३६ अंशांपेक्षा अधिक नोंदले गेले आहे. डहाणू येथे ३५ अंश, जळगाव, अकोला अमरावतीमध्ये तापमान ३४ अशांच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशांदरम्यान आहे. कोकणात ३५ ते ३७ अंश, मराठवाड्यात ३१ ते ३४ अंश; तर विदर्भात तापमान ३१ ते ३५ अशांच्या दरम्यान आहे. 

सकाळपासून असलेल्या उन्हामुळे उकाडाही वाढला आहे. तापमानात झालेली वाढीमुळे हवामानात स्थानिक बदल होऊन वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १७) कोकणात काही ठिकाणी; तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून (ता. १८) राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

बुधवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.२ (०.३), जळगाव ३४.४(-०.६), कोल्हापूर ३२.०(०.३), महाबळेश्वर २५.५(-०.२), मालेगाव ३३.२ (-०.४), नाशिक ३१.३ (-१.२), सातारा ३०.१ (-०.७), सोलापूर ३२.५ (-०.८), अलिबाग ३६.७ (४.३), डहाणू ३५.५ (२.७), सांताक्रूझ ३६.६ (३.२), रत्नागिरी ३६.८(४.६), औरंगाबाद ३१.५ (-०.६), परभणी ३२.९ (-०.२), नांदेड ३३.५ (-०.१), अकोला ३४.५ (०.६), अमरावती ३४.२ (०.२), बुलडाणा ३१.० (०.०), चंद्रपूर ३३.२(-०.१), गोंदिया ३२.०(-१.२), नागपूर ३३.३ (०.०), वर्धा ३२.८ (-०.५), यवतमाळ ३२.५(०.२).


इतर अॅग्रो विशेष
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...