agriculture news in Marathi normal rain possibility in state Maharashtra | Agrowon

राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यता

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पुढील पाच ते सहा दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पुढील पाच ते सहा दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेली आठ ते दहा दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती. अजूनही मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, काही भागांत सकाळपासून ऊन पडत आहे. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरणाची स्थिती होत आहे. त्यामुळे उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे ३५.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. 

सध्या मध्य महाराष्ट्र ते कोमोरिन परिसर व कर्नाटक आणि केरळ दरम्यान काही प्रमाणात कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ हवामान आहे. मंगळवारी (ता.२९) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा वगळता विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा 
पाऊस पडेल. तर बुधवारी (ता.३०) कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांसह जोरदार पाऊस पडेल. तर इतर भागात पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.

सध्या काही भागात काही अंशी ढगाळ राहणार असून अनेक भागात ऊन पडेल. त्यामुळे काही प्रमाणात उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...