हलक्या पावसाची शक्यता 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील तापमानात वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामान आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील तापमानात वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामान आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात बुधवारी (ता.६) व गुरुवारी (ता.७) हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

अरबी समुद्राचा वायव्य भाग ते उत्तर पंजाब या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर गुजरात व राजस्थानच्या नैऋत्य भाग आणि सौराष्ट्र व कच्छ परिसरात चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रिय स्थिती असल्याने उत्तर भारतात पावसासाठी पोषक वातावरण झाले आहे. यामुळे उत्तर भारतातील काही राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. आजही उत्तर भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम थंडीवर झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात अंशतः ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात आहे.  कोकण, मराठवाडा व विदर्भात कोरडे हवामान असल्याने बऱ्यापैकी थंडीत चढउतार होत आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पाराही कमीअधिक होत आहे. सध्या राज्यात किमान तापमान १२ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या तीन ते चार दिवस राज्यात थंडी बऱ्यापैकी राहणार आहे. रविवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमीअधिक असल्याचे चित्र होते. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली होती. 

रविवारी (ता.३) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः 

  • मुंबई (सांताक्रुझ) १९.७ (३ 
  • रत्नागिरी १९.३ 
  • डहाणू १९.५ (२) 
  • पुणे १४.७ (४) 
  • नगर १४.७ (४) 
  • जळगाव १६.७ (५) 
  • कोल्हापूर १७.४ (३) 
  • महाबळेश्वर १४.९ (२) 
  • मालेगाव १८.४ (८) 
  • नाशिक १६.४ (७) 
  • सांगली १६.० (२) 
  • सातारा १६.१ (४) 
  • सोलापूर १६.२ (१) 
  • औरंगाबाद १६.२ (५) 
  • परभणी १४.५ (२) 
  • नांदेड १५.० (२) 
  • उस्मानाबाद १४.६ (१) 
  • अकोला १७.२ (४) 
  • अमरावती १८.७ (३) 
  • बुलडाणा १७.० (३) 
  • चंद्रपूर १३.६ (१) 
  • गोंदिया १४.४ (२) 
  • नागपूर १५.१ (३) 
  • वर्धा १६.० (२) 
  • यवतमाळ १६.० (२) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com