agriculture news in Marathi, normal rain prediction sate,Maharashtra | Agrowon

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता. २१) सकाळपासूनच राज्याच्या बहुतांशी भागात ढग जमा झाले होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरीही पडल्या. आज (ता. २२) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता. २१) सकाळपासूनच राज्याच्या बहुतांशी भागात ढग जमा झाले होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरीही पडल्या. आज (ता. २२) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मध्य भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात हवेचे कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. तर मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा (मॉन्सून ट्रफ) पश्‍चिमेकडील भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकलेल्या स्थितीत आहे. तर मॉन्सून ट्रफचा पूर्व भाग कमी दाब क्षेत्राच्या केंद्रातून जात असल्याने मध्य भारतात पावसाला पोषक हवामान आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जोरदार पावसाचा आहे, तर विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

बुधवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.१ (२.४), नगर ३३.२ (३.८), जळगाव ३२.८(१.८), कोल्हापूर २९.५(२.५), महाबळेश्‍वर २१.१ (१.४), मालेगाव ३०.६ (०.४), नाशिक २७.५ (-०.५), सांगली २९.८ (०.९), सातारा २९.६ (३.१), सोलापूर ३४.६ (३.३), अलिबाग ३१.८ (२.२), डहाणू ३२.० (१.८), सांताक्रूझ ३१.८ (२.२), रत्नागिरी ३०.७ (१.९), औरंगाबाद ३१.९ (२.७), परभणी ३३.६ (२.३९), नांदेड ३३.० (१.६), अकोला ३१.९ (१.३), अमरावती ३०.६ (०.४), बुलडाणा २९.२ (१.९), ब्रह्मपुरी ३४.० (३.७), चंद्रपूर ३०.४ (-०.७), गोंदिया ३१.० (०.५), नागपूर ३२.५ (२.०), वर्धा ३२.० (१.८), यवतमाळ ३०.५ (१.३). 

बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : पोलादपूर २०, वैभववाडी, लांजा, मुलदे, गुहागर, दोडमार्ग, कणकवली, तळा प्रत्येकी १०. 
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर, गिरणा धरण, जामखेड, चाळीसगाव, नगर प्रत्येकी १०
मराठवाडा : वाशी ३०, लातूर, पाटोदा, मुखेड, जिंतूर प्रत्येकी १०.
विदर्भ : गडचिरोली ५०, गोंदिया, एटापल्ली प्रत्येकी ४०, मूल, तिरोडा प्रत्येकी ३०, सडक अर्जनी, साकोली, आहेरी, कोपर्णा, धानोरा, भामरागड, आमगाव, चामोर्शी, देवरी, देऊळगाव राजा, सिरोंचा, गोरेगाव प्रत्येकी २०, कुरखेडा, अरमोरी, सालकेसा, सिंदेवाही, झारीझामणी, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, कामठी, जोईती, कोर्ची, राळेगाव, अर्जुनी मोरगाव प्रत्येकी १०. 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...