हलक्या पावसाची शक्यता 

बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता.२०) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
Hawaman web
Hawaman web

पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता.२०) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आज (ता.१९) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात काही प्रमाणात पावसाची उघडीप आहे. रविवारी (ता.२०) आणि सोमवारी (ता.२१) कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार तर मराठवाडा व विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. मंगळवारी (ता.२२) राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पडेल. पुणे परिसरातही ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com