agriculture news in Marathi normal rain prediction in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 ऑगस्ट 2021

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात अनेक पाऊस पडत आहे. उद्या (ता.१) कोकण, विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात अनेक पाऊस पडत आहे. उद्या (ता.१) कोकण, विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर आहे. तर मध्य उत्तर प्रदेशमध्ये नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राज्यस्थानच्या गंगानगरपासून या दोन्ही कमी दाब क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. अरबी समुद्रात किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. 

पश्चिम बंगालमधील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे भारताकडे सरकत आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. 

येथे होणार जोरदार पाऊस 
रविवार ः
संपूर्ण राज्यात तुरळक 
सोमवार ः संपूर्ण राज्यात तुरळक 
मंगळवार ः संपूर्ण राज्यात तुरळक 
बुधवार ः संपूर्ण राज्यात तुरळक 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शनिवारी (ता.३१) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

 • पुणे - २६.२ (-१.४) 
 • जळगाव - ३१.६ (०.३) 
 • कोल्हापूर - २४.९ (-१.५) 
 • महाबळेश्वर - १९.५ 
 • मालेगाव - ३०.८ (१.१) 
 • नाशिक - २६.३ (-१.५) 
 • सांगली - २६.५ (-१.९) 
 • सातारा - २४.७ ( -१.७) 
 • सोलापूर - ३०.४ (-०.८) 
 • मुंबई (कुलाबा) - ३०.३ (०.५) 
 • अलिबाग - २९.६ (-०.१) 
 • रत्नागिरी - २९.४ (०.९) 
 • डहाणू - ३१.३ (१.२) 
 • औरंगाबाद - २६.२ (-३.०) 
 • परभणी - २९.१ (-१.६) 
 • नांदेड- ३३.० (१.७) 
 • अकोला - ३०.९, 
 • अमरावती - २९.० (-१.२) 
 • बुलडाणा - २६.५ (-१.६) 
 • ब्रम्हपुरी - ३०.१ (-०.१) 
 • चंद्रपूर - ३०.२ (-०.९) 
 • गोंदिया - २५.० (-६.०) 
 • नागपूर - २५.६ (-५.२) 
 • वर्धा - २७.० (-३.७) 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...