पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार 

गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर थैमान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात उघडीप दिली आहे.
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार 
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार 

पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर थैमान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. पुढील पंधरा दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

हवामान विभागाने जाहीर केलेल्या पुढील पंधरा दिवसाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात ३० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत उत्तर कोकण आणि आतापर्यंत पावसाचे कमी असलेल्या उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यातही ६ ते १२ ऑगस्ट या दरम्यान उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहून, अधून-मधून हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वदूर सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. कोकणात मात्र पावसाच्या सरी सुरूच राहण्याची शक्यता आहे. 

पुढील दोन आठवड्यांत कमाल तापमान सरासरी ते सरासरीच्या कमी राहणार असून, दुसऱ्या आठवड्यात दक्षिण कोकण आणि विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक राहण्याचा अंदाज आहे. दोन्ही आठवड्यांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार आहे. मराठवाड्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.  येथे होणार जोरदार पाऊस  शनिवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा,  रविवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  सोमवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  मंगळवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शुक्रवारी (ता.३०) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ 

  • पुणे - २५.३ (-२.१) 
  • जळगाव - ३१.६ (०.३) 
  • कोल्हापूर - २६.६ (०.४) 
  • महाबळेश्‍वर - १९ (-०.६) 
  • मालेगाव - ३०.४ (०.४) 
  • नाशिक - २६.६ (-१.०) 
  • सांगली - २८.१ 
  • सातारा - २४.७ ( -१.५) 
  • सोलापूर - २९.२ (-१.९) 
  • मुंबई (कुलाबा) - ३०.२ (०.४) 
  • अलिबाग - २९.८ (०.१) 
  • रत्नागिरी - ३०.४ (२.०) 
  • डहाणू - ३०.६ (०.३) 
  • औरंगाबाद - २५.९ (-३.१) 
  • परभणी - २७.७ (-३.०) 
  • नांदेड- ३३ (१.७) 
  • अकोला - २९.३ (-१.८), 
  • अमरावती - २८.८ (-३.०) 
  • बुलडाणा - २६.२ (-१.६) 
  • ब्रह्मपुरी - ३०.१ (-०.१) 
  • चंद्रपूर - २९.२ (-१.८) 
  • गोंदिया - २८.० (-३.०) 
  • नागपूर - ३०.३ (-०.३) 
  • वर्धा - २९.२ (-१.१) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com