agriculture news in Marathi normal rain prediction in two weeks Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर थैमान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात उघडीप दिली आहे.

पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर थैमान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. पुढील पंधरा दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

हवामान विभागाने जाहीर केलेल्या पुढील पंधरा दिवसाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात ३० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत उत्तर कोकण आणि आतापर्यंत पावसाचे कमी असलेल्या उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यातही ६ ते १२ ऑगस्ट या दरम्यान उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहून, अधून-मधून हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वदूर सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. कोकणात मात्र पावसाच्या सरी सुरूच राहण्याची शक्यता आहे. 

पुढील दोन आठवड्यांत कमाल तापमान सरासरी ते सरासरीच्या कमी राहणार असून, दुसऱ्या आठवड्यात दक्षिण कोकण आणि विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक राहण्याचा अंदाज आहे. दोन्ही आठवड्यांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार आहे. मराठवाड्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. 

येथे होणार जोरदार पाऊस 
शनिवार ः
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, 
रविवार ः संपूर्ण राज्यात तुरळक 
सोमवार ः संपूर्ण राज्यात तुरळक 
मंगळवार ः संपूर्ण राज्यात तुरळक 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शुक्रवारी (ता.३०) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ 

 • पुणे - २५.३ (-२.१) 
 • जळगाव - ३१.६ (०.३) 
 • कोल्हापूर - २६.६ (०.४) 
 • महाबळेश्‍वर - १९ (-०.६) 
 • मालेगाव - ३०.४ (०.४) 
 • नाशिक - २६.६ (-१.०) 
 • सांगली - २८.१ 
 • सातारा - २४.७ ( -१.५) 
 • सोलापूर - २९.२ (-१.९) 
 • मुंबई (कुलाबा) - ३०.२ (०.४) 
 • अलिबाग - २९.८ (०.१) 
 • रत्नागिरी - ३०.४ (२.०) 
 • डहाणू - ३०.६ (०.३) 
 • औरंगाबाद - २५.९ (-३.१) 
 • परभणी - २७.७ (-३.०) 
 • नांदेड- ३३ (१.७) 
 • अकोला - २९.३ (-१.८), 
 • अमरावती - २८.८ (-३.०) 
 • बुलडाणा - २६.२ (-१.६) 
 • ब्रह्मपुरी - ३०.१ (-०.१) 
 • चंद्रपूर - २९.२ (-१.८) 
 • गोंदिया - २८.० (-३.०) 
 • नागपूर - ३०.३ (-०.३) 
 • वर्धा - २९.२ (-१.१) 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...