तुरळक ठिकाणी हलक्या सरी 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात दोन दिवसांपासून चांगलेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे कांदा, द्राक्षे, आंबा उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहे.
rain
rain

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात दोन दिवसांपासून चांगलेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे कांदा, द्राक्षे, आंबा उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. परंतु रविवारी दुपारनंतर पुन्हा अचानक ढग भरून आल्याने नगर जिल्ह्यात नेवासा, सांगलीतील नेर्ले, साताऱ्यातील वाळवा, नाशिक, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जोरदार वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. जोरदार पाऊस झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 

राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागांत, कोकणातील सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे शेतातील पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झालेले नसले तरी पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. रविवारी सकाळपासून हवामान ढगाळ होते. अधूनमधून काही प्रमाणात ऊन पडत असले तरी निवळण्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. परंतु दुपारनंतर पुन्हा अचानक ढग भरून आल्याने मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून वातावरणात चांगलेच बदल झाले आहे.  पिकांना फटका  मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची स्थिती अधिक असल्याने उन्हाचा चटका चांगलाच कमी झाला आहे. मराठवाड्यातही ऊन आणि ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. मराठवाड्यातील सिल्लोड तालुक्यातील उपळी परिसरातही वादळी वारे व मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे द्राक्षे व भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच भागात ढगाळ हवामानामुळे कलिंगड, खरबूज व भाजीपाला उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. नगरमधील नेवासा तालुक्यातही काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com