agriculture news in Marathi normal rain in several places Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी हलक्या सरी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

पूर्वमोसमी पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस रखडलेल्या शेतीकामांना पुन्हा काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. 

पुणे : पूर्वमोसमी पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस रखडलेल्या शेतीकामांना पुन्हा काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. नाशिक, पुणे, नगर, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने शेतकरी चांगलाच हातघाईस आला आहे. 

गेल्या आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे कांदा, द्राक्षे, आंबा, कलिंगड, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे अजूनही झाले नसले, तरी तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे. परंतु वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. तसेच पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे न झाल्यास नुकसान भरपाईपासून अनेक शेतकरी वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. 

विदर्भात व कोकणात काही प्रमाणात आकाश निरभ्र असले, तरी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चांगलेच चिंतेत आहे. 

शेतकऱ्यांची धावपळ 
पूर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडवली आहे. दिवसभर उन्हाचा चटका तर दुपारनंतर वादळ, वेगाने वाहणारे वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने काढणी केलेला कांदा, कलिंगड, गहू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील पश्‍चिम भागात वादळी वारा व जोरदार पाऊस झाला. यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले असून उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे.  

 
 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...