बहुतांशी भागांत पावसाचा जोर ओसरला

बहुतांशी भागांत पावसाचा जोर ओसरला
बहुतांशी भागांत पावसाचा जोर ओसरला

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी (ता. ९) ओसरला होता. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, मात्र तर मंगळवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाच्या सरी येत होत्या. आज (ता. १०) कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भागातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. घाटमाथ्यावरील शिरगाव, ताम्हिणी येथे सर्वाधिक २५० मिलिमीटर, दावडी २००, डुंगरवाडी १९०, कोकणातील जव्हार १८०, मंडगणगड १७०, मध्य महाराष्ट्रातील लोणावळा येथे १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे नद्या, नाल्यांमधून पाणी वाहत असून, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.    मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : जव्हार १८०, भिरा, मंडणगड प्रत्येकी १७०, पेण, माथेरान प्रत्येकी १४०, माणगाव, सांताक्रूझ, उल्हासनगर, वाडा, मोखेडा प्रत्येकी १३०, पोलादपूर ११०, विक्रमगड १००, महाड, तळा, पनवेल प्रत्येकी ९०, भिवंडी, उरण, अंबरनाथ, कर्जत प्रत्येकी ८, रोहा, सुधागडपाली, कल्याण प्रत्येकी ७०, ठाणे, म्हसळा, वैभववाडी, मुरूड, वाकवली प्रत्येकी ६०, दोडामार्ग, वसई प्रत्येकी ५०.  मध्य महाराष्ट्र : लोणवळा १७०, वेल्हा १५०, महाबळेश्वर १४०, पौड १३०, त्रिंबकेश्वर, इगतपुरी प्रत्येकी ११०, भोर १००, गगनबावडा ९०, चंदगड, ओझरखेडा प्रत्येकी ८०, आजरा, पेठ, शाहूवाडी प्रत्येकी ७०, पन्हाळा, जावळी प्रत्येकी ६०, सुरगाणा, दहिगाव, राधानगरी प्रत्येकी ५०, सासवड, वडगाव मावळ, यावल प्रत्येकी ४०, खेड, वाई, नेवासा, भुसावळ, मोहोळ, जळगाव, गारगोटी प्रत्येकी ३०.  मराठवाडा : औंढा नागनाथ,  कळमनुरी प्रत्येकी ५०, माहूर, हिमायतनगर प्रत्येकी ४०, हिंगोली, हादगाव, किनवट प्रत्येकी २०, कन्नड, कळंब, लातूर, सेनगाव, तुळजापूर, भूम, वाशी,  आंबेजोगाई प्रत्येकी १०.  विदर्भ : कुरखेडा, कोर्ची, शेगाव, देसाईगंज प्रत्येकी ४०, ब्रह्मपुरी, भामरागड, रिसोड, तिवसा, नागभिड, बुलडाणा, एटापल्ली, सेलू, नांदूरा प्रत्येकी ३०, सालकसा, अरमोरी, आष्टी, मातोळा, खामगाव, बाळापूर, रामटेक, लोणार, आर्णी, परसवाडा, चांदूरबाजार, वाशीम,  आमगाव, पातूर, आहेरी, उमरखेड, गोंदिया, भिवापूर, तुमसर, पुसद प्रत्येकी २०.  घाटमाथा : शिरगाव, ताम्हिणी प्रत्येकी २५०, दावडी २००, डुंगरवाडी १९०, लोणवळा १७०, धारावी, खोपोली प्रत्येकी १५०, वळवण, आंबोणे प्रत्येकी १३०, कोयना नवजा ११०, शिरोटा १०, भिवापुरी ९०, ठाकूरवाडी, वाणगाव प्रत्येकी ८०.  मॉन्सूनची थोडी प्रगती नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. ९) पंजाब, हरियाना, राजस्थानचा आणखी काही भाग व्यापला आहे. सुरवातीपासून अडखळत प्रगती करणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल धीम्या गतीने सुरू आहे. शनिवारी (ता. ६) देशाच्या बहुतांशी भागात पोचलेल्या मॉन्सूनला देश व्यापण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com