उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्र

उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्र
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्र

नाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ६ हजार ७२ पैकी तब्बल २ हजार ३१६ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील विभागातील पाणीटंचाईबाबत उपाययोजना आखण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर धावपळ सुरू आहे. दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी सरकारने नुकतीच जाहीर केली असून, उत्तर महाराष्ट्रातील ५४ पैकी ३९ तालुक्यांचा त्यात समावेश आहे. स्थानिक प्रशासनानेही संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला आहे. नाशिक विभागातील ५४ पैकी तब्बल ४९ म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक तालुक्यांतील भूजल पातळीत तीन मीटरपर्यंत घट आली आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीचा विचार करता भूजल पातळीत घट झालेल्या तालुक्यांची संख्या प्रथमच वाढली आहे. २३ तालुक्यांमध्ये १ मीटर, १५ तालुक्यांमध्ये १ ते २ मीटर, ७ तालुक्यांमध्ये २ ते ३ मीटर आणि ४ तालुक्यांमध्ये ३ मीटरहून जास्त भूजल पातळीत घट आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील ८, धुळे जिल्ह्यातील ३, नंदुरबारमधील ४, जळगावमधील १३ आणि नगरमधील ११ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश आहे. विभागातील नंदुरबार, भुसावळ, रावेर आणि यावल या चार तालुक्यांतील भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट आल्याने या तालुक्यांतील गावांना पाणीटंचाईची झळ सर्वांत जास्त बसणार आहे.

टंचाईग्रस्त गावे वाढणार

प्रशासनाने जाहीर केलेल्या संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यात ४६९, जानेवारी ते मार्च २०१९ या दुसऱ्या टप्प्यात ६४२ आणि एप्रिल ते जून २०१९ या तिसऱ्या टप्प्यात १ हजार २०५ अशा एकूण २ हजार ३१६ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, भूजल पातळीत घट आलेल्या तालुक्यांची संख्या विचारात घेतल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

८८९ गावांमध्ये पाणीबाणी

विभागातील १९४ गावे आणि ६९५ वाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गावे व वाड्यांवरील ४ लाख १९ हजार ७७१ नागरिकांना प्रशासनातर्फे ५३ शासकीय आणि १४१ खासगी अशा १९४ टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. प्रशासनाकडे सध्या शेकडो गावांचे टँकर्स मागणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल झालेले आहेत, त्यामुळे हा टंचाईग्रस्त गावांचा आकडा जानेवारीपर्यंत २ हजारांवर पोचण्याची शक्यता आहे. विभागातील पशुधन आणि उपलब्ध चाऱ्याची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विभागातील १०१ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.

विभागातील टंचाई स्थिती

 नाशिक जिल्हा

तालुका गावे - वाड्या टँकर्स
मालेगाव ६९ १६
नांदगाव   ६५
सिन्नर १२२ १८
येवला ४६ १८
देवळा
बागलाण

 धुळे जिल्हा

तालुका गावे - वाड्या टँकर्स
शिंदखेडा
धुळे   

 जळगाव जिल्हा

तालुका गावे - वाड्या टँकर्स
जळगाव
भुसावळ
चाळीसगाव  
अमळनेर १७

 नगर जिल्हा

तालुका गावे - वाड्या टँकर्स
संगमनेर    ८४ २२
पारनेर १४३ २५
पाथर्डी २६४ ५३
नगर १९
शेवगाव
एकूण ८८९ १९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com