उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी कादवाची राहणार

Marathi North Maharashtra will have the highest number of FRP mud : shete
Marathi North Maharashtra will have the highest number of FRP mud : shete

नाशिक : जिल्ह्यात सर्व सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना कादवाची परिस्थितीही तीच होती, परंतु कादवाचे विद्यमान संचालक मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काटकसर, नियोजन व पारदर्शी कारभार करत कारखाना सुस्थितीत सुरू ठेवला आहे. कादवा या वर्षी अधिक कार्यक्षमतेने गाळप करणार आहे. कोणतेही उपपदार्थनिर्मिती नसताना उसाला सर्वाधिक भाव दिला असून या वर्षीही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी कादवाची राहणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (ता. १) झाला. या प्रसंगी अध्यक्ष श्रीराम शेटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे माजी अध्यक्ष अॅड. बाजीराव कावळे होते.

या वेळी श्रीराम शेटे यांनी गेली बारा वर्षांतील कादवाची वाटचाल कशाप्रकारे झाली याबद्दल माहिती दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सत्ताप्राप्त झाल्यानंतर कारखाना सुरू ठेवला. संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करत योग्य नियोजन व काटकसर करत कादवा अडचणीतून बाहेर काढला. अधिक क्षमतेच्या व अत्याधुनिक टाकल्या असून त्यामुळे गाळप कार्यक्षमता वाढली आहे. सर्वाधिक भाव व वेळेवर पैसे अदा होत असल्याने ऊस उत्पादकांची पसंती कादवाला आहे. मात्र, कमी गाळप क्षमता असल्याने गाळप मर्यादा येत होत्या. मात्र, यांत्रिकीकरण केल्याने आता गाळप क्षमता वाढणार आहे. यंदा चांगला पाऊस झालेला असल्याने अधिक ऊस लागवड करणे शक्य असून जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले. 

या वेळी संपतराव शिवराम घडवजे, नरेश देशमुख, भिकनराव देशमुख, कैलास भगवंत पाटील, विनायक बर्डे या सर्वांनी सपत्निक गव्हाणपूजन केले. जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील यांच्या हस्ते नवीन मिलचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली. या वेळी माजी अध्यक्ष अॅड. बाजीराव कावळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, साहेबराव पाटील, संचालक बाळासाहेब जाधव आदींची भाषणे झाली.

या वेळी मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील, संजय पडोळ, सदू अप्पा शेळके आदींसह सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक शहाजी सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले; तर प्रा. लक्ष्मण महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. का

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com