agriculture news in marathi, north mararashtra to feel more cold | Agrowon

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुणे : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असले, तरी राज्याच्या उर्वरित भागात आकाश निरभ्र होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दोन दिवसांत तापमान कमी होऊन गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (ता. १३) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा खाली घसरून, राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

पुणे : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असले, तरी राज्याच्या उर्वरित भागात आकाश निरभ्र होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दोन दिवसांत तापमान कमी होऊन गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (ता. १३) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा खाली घसरून, राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या हवेचा अभाव, समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात गारठा कमी होऊन ढगाळ हवामान होत होते. गुरुवारी कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मात्र आकाश निरभ्र झाल्याचे दिसून आले. जवळपास आठवडाभरापासून राज्यातील गारठा नाहीसा झाला असून, किमान तापमानात २ ते ७ अंशांपर्यंची वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी थंडी कमी होऊन उबदार हवामान होत आहे. दोन दिवसांत विदर्भासह पूर्व भारतातील राज्यात तापमान कमी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उर्वरित राज्याच्या तापमानातही चढ-उतार होणार आहे. 

गुरुवारी (ता. १३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणांचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.५ (४), नगर १७.३ (५), जळगाव १४ (०), कोल्हापूर १९.१ (३), महाबळेश्‍वर १५.७ (२), मालेगाव १८.६ (७), नाशिक १८.३ (७), निफाड १०.६, सांगली १९.१ (३), सातारा १७.१ (३), सोलापूर २०.२ (२), डहाणू २३.६ (६), सांताक्रूझ २१.७ (४), रत्नागिरी २१.५ (२), औरंगाबाद १६.३ (३), परभणी १५.२ (-१), नांदेड १४.० (-१), अकोला १५.१ (-१), अमरावती १६.४ (०), बुलडाणा १५.४ (-१), चंद्रपूर १४.२ (-३), गोंदिया १३.५ (-२), नागपूर १२.४(-३), वर्धा १४.५ (०), यवतमाळ १५.४ (-२).


इतर अॅग्रो विशेष
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...