उत्तर सोलापुरात  अतिवृष्टीने पिकांचे नुकसान 

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात बहुतेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.रविवारीही दिवसभर पावसाची थांबून-थांबून संततधार सुरुच होती.
 उत्तर सोलापुरात  अतिवृष्टीने पिकांचे नुकसान  In North Solapur Crop damage due to excess rainfall
उत्तर सोलापुरात  अतिवृष्टीने पिकांचे नुकसान  In North Solapur Crop damage due to excess rainfall

वडाळा, (जि. सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात बहुतेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी (ता.२५) रात्री पावणे दहा ते अकरा वाजेपर्यंत मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर, उत्तर सोलापुरातील रानमसले, कौठाळी, कळमण परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलेच झोडपले. रविवारीही दिवसभर पावसाची थांबून-थांबून संततधार सुरुच होती.  उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या महिन्यातभरात अधून मधून पाऊस बरसतो आहे. त्यात कांदा ,सोयाबीन, उडीद, मका, तूर पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस आता मात्र खरीप पिकांना नुकसानकारक ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कांदा, उडीद, सोयाबीन, मुग, मका, भाजीपाला पाण्यातच सडून जात आहे. यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे सध्या रानमसले, वडाळा, नान्नज, पडसाळी, कळमण, गावडी दारफळ, वांगी, शेजारील खुनेश्वर, मोरवंची या परिसरात ही अशीच अवस्था झाली आहे. सध्या रानमसले परिसरात शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.ओढे, नाले ,विहीरी तुटुंब भरुन वाहत आहेत. 

कौठाळीचा संपर्क तुटला 

कौठाळी-कळमण रोडावरील दरम्यान पुलावर पाणी आल्याने कौठाळी गावचा संपर्क तुटला आहे. तसेच रानमसले-खुनेश्वर, रानमसले-पडसाळी, रानमसले-वांगी रस्त्यावर वांगिरा व ढोहिरा ओढा दुथडी भरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. रानमसले परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. मात्र ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे आतोनात नुकसान झाले आहे. सतत ओल राहिल्याने कांद्याच्या मुळ्या सडू लागल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com