agriculture news in marathi, not ban on glyphosate, Maharashtra | Agrowon

‘ग्लायफोसेट’वर बंदी नाही
मनोज कापडे
रविवार, 23 सप्टेंबर 2018

पुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्यामुळे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी घालण्याचा विचार स्थगित करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्यामुळे मोन्सॅन्टोसह ४० कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ३५ लाख लिटर ग्लायफोसेट विकले जाते.

अमेरिकेतील एका न्यायालयाने मोन्सॅन्टोने ग्लायफोसेट हे कार्सिनोजेनिक असल्याची बाब दडवून ठेवल्याची तक्रार ग्राह्य धरत कंपनीने दंड आणि नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये ग्लायफोसेटवर बंदी घालण्याच्या संदर्भात वाद-विवाद सुरू आहे. 

पुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्यामुळे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी घालण्याचा विचार स्थगित करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्यामुळे मोन्सॅन्टोसह ४० कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ३५ लाख लिटर ग्लायफोसेट विकले जाते.

अमेरिकेतील एका न्यायालयाने मोन्सॅन्टोने ग्लायफोसेट हे कार्सिनोजेनिक असल्याची बाब दडवून ठेवल्याची तक्रार ग्राह्य धरत कंपनीने दंड आणि नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये ग्लायफोसेटवर बंदी घालण्याच्या संदर्भात वाद-विवाद सुरू आहे. 

‘ग्लायफोसेट’चे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्या केंद्रीय कीटकनाशके नियम १९७१ मधील १९ व्या नियमाचे उल्लंघन करीत असल्याचा ठपका ठेवत ग्लायफोसेटवर बंदी आणण्यासाठी कृषी खात्याने कायदेशीर कारवाई सुरू केली होती. कीटकनाशके कायदा १९६८ मधील कलम चौदा (१) नुसार ‘ग्लायफोसेट’ उत्पादक कंपन्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. ‘ग्लायफोसेट’मुळे मानवी आरोग्यास धोका झाल्याचे सिद्ध झालेले नाही; तसेच या मूलद्रव्याच्या विक्री व उत्पादन व्यवस्थेविषयीच्या नियमावलींचे पालन केले जाते अशी बाजू कंपन्यांनी मांडली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कृषी विभागाने या कंपन्यांनी मांडलेली बाजू मान्य केली आहे. तसेच, ‘ग्लायफोसेट’ बंदी आणल्यास कमी किमतीमधील इतर कोणतेही तणनाशक शेतकऱ्याच्या हाती नसल्याची बाबदेखील मान्य केली असून बंदीचा विचार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

‘‘ग्लायफोसेट’वर बंदी टाकण्याचा निर्णय घेणे हे राज्याच्या कृषी खात्याला मोठी आफत ओढावून घेण्यासारखे वाटत होते. कारण, देशात सर्वत्र या तणनाशकाला मान्यता आहे. केंद्र शासनदेखील विरोधाची भूमिका घेत नाही. त्यामुळे बंदी घातल्यानंतर पुढे न्यायालयीन लढाईत राज्याचा कृषी विभाग एकाकी पडला असता,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.
देशात ‘ग्लायफोसेट’चा उत्पादन व विक्रीचा परवाना केवळ चहा पिकावर तसेच मोकळ्या जागेवर वापरण्यासाठीच दिलेला आहे. त्यामुळे इतर पिकांसाठी या तणनाशकाचा वापर बेकायदेशीर ठरतो. 

पर्याय उपलब्ध नाही
‘मान्यता असलेल्या पिकाव्यतिरिक्त या तणनाशकाचा 
वापर होत असल्याची ही बाब खरी आहे. मात्र शेतकरीवर्गाला इतर पर्यायदेखील नाहीत. तसेच, देशातील कोणत्याही कर्करोगविषयक संशोधन व उपचार करणाऱ्या संस्थेने ‘ग्लायफोसेट’ तणनाशक ‘कार्सिनोजेनिक’ असल्याचा अभिप्राय दिलेला नाही. या सर्व बाबींमुळे तूर्तास राज्यात ‘ग्लायफोसेट’वर बंदी आणण्याचा विचार स्थगित केला गेला आहे,’’ असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...
पीकविमा सुधारणेसाठी अखेर समिती स्थापनपुणे: ‘‘राज्यात सध्या राबविल्या जात असलेल्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत रखडण्याची...मुंबई: फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...
पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...