agriculture news in marathi Not bounded to government fixed milk rate : Private dairies | Agrowon

दुधासाठीचा हमीभाव आम्हाला लागू नाही; खासगी डेअरीचालकांचा दावा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

पुणे : राज्यातील जादा दूध खरेदी अनुदान योजना फक्त सहकारी संघांना लागू आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेला प्रतिलीटर २५ रुपयांचा हमीभाव देण्याचे बंधन आम्हांला लागू नाही, अशी भूमिका काही खासगी डेअरीचालकांनी घेतली आहे. 

पुणे : राज्यातील जादा दूध खरेदी अनुदान योजना फक्त सहकारी संघांना लागू आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेला प्रतिलीटर २५ रुपयांचा हमीभाव देण्याचे बंधन आम्हांला लागू नाही, अशी भूमिका काही खासगी डेअरीचालकांनी घेतली आहे. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे राज्यात दुधाची खरेदी घटली आहे. दुधाला ग्राहक नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी भाव कमी दिला जात आहे. त्यामुळे रोज दहा लाख लीटर दूध महानंदमार्फत खरेदी करण्याची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. मात्र, योजनेत केवळ सहकारी दूध संघांचेच दूध घेतले जाणार आहेत. त्यामुळे सहकारी संघांचे जाळे नसलेल्या भागातील दूध उत्पादक शेतकरी अनुदान योजनेपासून वंचित राहणार आहेत. 

‘‘राज्याच्या दुग्ध व्यवसायाचे चित्र विचारात न घेता शासनाने अनुदान योजना सुरू केली आहे. मुळात ८० टक्के दूध हे खासगी प्रकल्पांकडून जमा केले जाते. केवळ २० टक्के संकलन सहकारी संघांकडून केले जात असताना खासगी प्रकल्पांना अनुदानापासून वंचित ठेवण्याची खेळी कोणी खेळली,’’ असा सवाल महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केला आहे. २५० पैकी १७३ डेअरी प्रकल्प या संघाच्या गोटात आहेत. शासनाने अनुदान योजना तयार करताना कल्याणकारी संघाला विश्वासात घेतले नाही, असे काही सभासदांचे म्हणणे आहे. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे दुधाला मागणी घटली. त्यामुळे खासगी डेअरीचालकांनी शेतकऱ्यांचे दूध खरेदी दर ३२ वरून थेट १८ ते २० रुपये प्रतिलीटरवर आणले आहेत. 

‘शिखर समितीला दूर का ठेवले’
शासनाने काही दिवसांपूर्वीच एक शिखर समिती स्थापन केली. या समितीत सहकाराबरोबरच खासगी डेअरी उद्योजकांचा समावेश आहे. मग या समितीला दूर का ठेवले गेले हा प्रश्नच आहे. या समितीत कुतवळ फुडस् कंपनीचे (ऊर्जा दूध) अध्यक्ष प्रकाश कुतवळ, इंदापूरच्या सोनाई दूध उद्योग समुहाचे अध्यक्ष दशरथ माने, चितळे डेअरी समुहाचे अध्यक्ष श्रीपादराव चितळे, पराग (गोवर्धन) मिल्क उद्योगाचे अध्यक्ष प्रीतम शहा अशा खासगी दूध उद्योजकांचा समावेश होता. 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...